अभिषेक बच्चन करतो या अभिनेत्रीला डेट, ऐश्वर्या रायसोबत बिनसल्याच्या चर्चेला ऊत

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन सार्वजनिक कार्यक्रमात सोबत दिसत नाही. अनंत अंबानीच्या लग्नातही ऐश्वर्या ही तिच्या मुलीसोबत दिसून होती तर अभिषेक त्याच्या कुटुंबासमवेत पोहाचला होता. या दरम्यान सोशल मीडियावर भलताच दावा केला जातो आहे. या स्टार कपलचा घटस्फोट होणार आहे, अशाही बातम्या प्रसारमाध्यमांत आल्या होत्या. मात्र अद्याप दोघांचा घटस्फोट झाला नसला तरी गेल्या काही दिवसापासून अभिषेकचे नाव त्याच्या एका सहकलाकारासोबत जोडले गेले आहे.
सोशल मीडियावर विविध पोस्टमधून असा दावा केला जात आहे की अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री निमृत कौर एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या रिलेशनशिपची अफवा पसरल्याने निमृतला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे. तिच्या विविध पोस्टवर ऐश्वर्याच्या चाहत्यांनी टीकाही केली आहे.
अभिषेक बच्चनसोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्याने निमृत कौर सध्या ट्रोल्सच्या निशाण्यावर आहे. अलीकडेच ती एका इव्हेंटदरम्यान स्पॉट झाली होती. पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओवर असंख्य कमेंट तिच्या आणि अभिषेकच्या नात्याविषयीच आहेत. अनेकांनी ही अफवा खरी आहे का, असा सवाल केला आहे, तर काहींनी थेट तिच्यावर टीका केली आहे.
विरल भयानीने शेअर केलेल्या तिच्या व्हिडिओवर एकाची कमेट आहे की, ‘ही आता निमृत बच्चन होण्याची आशा करते आहे.’ अन्य एकाने लिहिले की, ‘ऐश्वर्याचा संसार मोडला.’ एकाने कमेंट करत निमृतला ‘ऐश्वर्याची सवत’ म्हटले आहे. काहींनी असे विचारले आहे की, अभिषेक आणि निमृत यांचे नाव एकत्र का जोडले जात आहे? एकंदरित सध्या निमृत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
निमृत आणि अभिषेक यांच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान या नात्याबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. या दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास अलीकडेच ते ‘दसवी’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यांचा हा सिनेमा चांगलाच लोकप्रियही ठरला.