इतर
अल्पवयीन मुलीला धमकावून अत्याचार; व्हिडीओ केला व्हायरल
छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीसह तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर एकाने घरात शिरून वारंवार अत्याचार केला. त्याचा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल केला. ही घटना ६ सप्टेंबर २०२३ ते २८ जून २०२४ या काळात धामणगाव, ता. खुलताबाद येथे घडली. राहुल शांताराम धनेधर (रा. ताजनापूर बाजार सावंगी, ता. खुलताबाद) असे आरोपीचे नाव आहे. धनेधर याने पीडित अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असताना तिला आणि तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्याचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. अखेर पीडितेने वेदांतनगर पोलीस ठाणे गाठून धनेधर याच्याविरुद्व तक्रार दिली. त्यावरून बलात्कार, पॉस्को, आयटीसह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.