तीन अल्पवयीन मुलांनी केली ५ वर्षांच्या चिमुकल्याची हत्या

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एका मदरस्यात तीन अल्पवयीन मुलांनी ५ वर्षांच्या चिमुकल्याची हत्या केली आहे. तालीम उल कुरान नामक मदरस्यात ही घटना घडली आहे. ही मदरशा दिल्लीतील दयालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. पोलिसांनी याप्रकरणी तिन्ही आरोपी मुलांना अटक केली आहे.
मृत बालक रुहान या तिघांना वारंवार शिव्या देत असत. हत्यच्या दिवशीही रुहान यांने या ितघांना शिवीगाळ केली. त्यामुळे या ितघांना राग अनावर झााला. रागात या तिन्ही अल्पवयीन आरोपींनी मिळून त्याची हत्या केली. तसेच त्या मुलांचा समज होता रुहानच्या मृत्यूनंतर त्यांना घरी जाण्यासाठी एक दिवस सुट्टी मिळेल.
रुहानचा मदरशात मृतदेह सापडल्याचे कळताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना माहिती कळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. चौकशी करुन पोलिसांनी मुलाचा मृतदेह नंतर गुरु तेग बहादूर रुग्णालयातून ताब्यात घेत शवागारात सुरक्षित ठेवला आहे. पोलिसांनी तात्काळ प्रकरणाचा तपास हाती घेतला. मदरस्यातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तेथे शिकणाऱ्या तीन आरोपी मुलांना अटक केली आहे.