मुंबईत शिक्षकाचा विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार

मुंबई : मुंबईत खासगी शिकवणी शिक्षकांने एका विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. ही घटना धारावी परिसरात घडली आहे. 14 वर्षीय विद्यार्थ्याला मोबाइलमध्ये पाॅर्न व्हिडिओ दाखवत, त्याचे दोन्ही हात चादरीने बांधून त्या नराधम शिक्षकांने त्याच्यावरती अनैसर्गिक अत्याचार केला.
मायतरी अशान्ना (वय ३४) असे त्या नराधम शिक्षकाचे नाव असून याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. आरोपी शिक्षकाचे धारावी ९० फिट रोड येथे माय ट्युटोरियल नावाचे खासगी क्लासेस आहेत. २१ जुलै रोजी शिक्षकाने त्याच्यावर अनैसर्गिक क्रत्य केले. मात्र बदनामीच्या भितीने त्याने याबाबत कुठेही काहीही सांगितलं नाही. या घटनेनंतर विद्यार्थी मानसिक तणावाखाली गेला होता. कुटुंबातील सदस्यांनी मुलाला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याने त्याबाबतची माहिती दिली आहे. या प्रकरणी धारावी पोलिस अधिक तपास करत आहेत.