इतर

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला ५ हजारांची लाच घेणं भोवलं

पांढरकवडा : पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले श्री प्रकाश बाबुराव भगत वय 57 वर्ष पद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वर्ग 3 पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे कार्यरत होते. या प्रकरणातील तक्रारदार यांनी दिनांक 11 जुलै 2024 रोजी त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी व पीसीआर न घेण्यासाठी तसेच मदत करण्यासाठी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री प्रकाश भगत तक्रारदार यांना पाच हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत सविस्तर तक्रार दिली सदर तक्रारीवरून १२ जुलै 2024 रोजी पंचायत समक्ष करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान तक्रारदार यांना त्यांचे विरुद्ध दाखल असलेले गुन्हे असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी व पीसीआर न घेण्यासाठी तसेच मदत करण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले. त्याकरिता आज दिनांक 13 जुलै 2024 रोजी सापळा रचण्यात आला. पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या बाजूला वसंतराव नाईक चौकामध्ये कारवाही दरम्यान पंचा समक्ष सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री प्रकाश भगत यांनी पाच हजार रुपये लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना रंग यात पकडण्यात आले आहे नमूद आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन पांढरकवडा यवतमाळ येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कार्यवाही माननीय श्री मारुती जगताप पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परीक्षेत अमरावती श्री अनिल पवार अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र श्री मिलिंद कुमार बहाकर पोलीस उपअधीक्षक लाच लुपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपाधीक्षक श्री मंगेश मोहोळ पोलीस अंमलदार शैलेश कडू आशिष जांभळे राजेश मेटकर अब्दुल वसीम सुरज मेश्राम होऊनी प्रदीप बारबुदे यांनी पार पाडली नागरिकांनी अशा प्रकारे भ्रष्टाचारासंबंधी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button