10 डिटोनेटरद्वारा रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी केला लष्कराची रेल्वे उडवण्याचा प्रयत्न
भोपाळ : मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेला उडवण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी पाेलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रेल्वे रुळावर 10 डिटोनेटर ठेवणाऱ्याला अटक करण्यात आली अाहे. रेल्वे रुळावर डिटोनेटर लावणारा साबीर हा रेल्वे कर्मचारी आहे. साबीरने पोलिस चौकशीत सांगितले की, नेपानगर येथील रेल्वे रुळावर डिटोनेटर ठेवले होते. आर्मी स्पेशल ट्रेन उडवण्याचा त्याचा कट होता.
साबीरला सोमवारी खंडवा दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 25 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याचवेळी आणखी एका कर्मचाऱ्याची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी साबीर हा रेल्वेत नोकरीस आहे. त्यांचे काम रेल्वे रुळांवर गस्त घालण्याचे होते. साबीरने डिटोनेटर्स चोरल्याचे सांगितले जात आहे. साबीरवर डिटोनेटर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.