भारतमहाराष्ट्र

गडचिरोलीत 12 नक्षलवादी ठार; 2 जवान जखमी

6 तास चालली पोलीस नक्षल - चकमक; नक्षल्यांचे स्वयंचलित शस्त्रे जप्त

गडचिरोली : छत्तीसगड सीमेजवळ इंटला गावाजवळ 12-15 नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आज 17 जुलै रोजी नक्षल शोध मोहीम राबविली असता सकाळी 10 वाजतापासून तब्बल 6 तास झालेल्या पोलीस – नक्षल चकमकित पोलिसांनी 12 नक्षल्यांन्या यमसदणी पाठविले असून यात 2 पोलीस जवान जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून 3 एके 47, 2 इन्सास , 1 कार्बाइन, 1 एसएलआर यासह 7 ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त केले आहेत.

टिपागड दलम चा प्रभारी डीव्हीसीएम लक्ष्मण उर्फ विशाल आत्राम हा मृत नक्षल्यांपैकी एक असल्याची ओळख पटली आहे. इतर नक्षल्यांची ओळख पटविणे सुरु असून या परिसरात पोलिसांची शोध सुरू आहे.यात नक्षल्यांचे आणखी मृतदेह हाती लागण्याची शक्यता वर्तवीण्यात येत आहे.

या चकमकीत सी – 60 चे एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक जवान गोळ्या लागून जखमी झाले आहेत . त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. गडचिरोली पोलिसांनी एकाचवेळी 12 नक्षल्यांना कंठस्नान घातल्याने नक्षल चळवळीचे कंबरडे मोडले.

गडचिरोली पोलिसांना 51 लाखाचे बक्षीस
सदर मोहीम फत्ते केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी -60 कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button