क्राइममहाराष्ट्र

जागेवरून उठायचे नाही; तुम्हाला व्हर्च्युअल अरेस्ट केलेय; तोतया सीबीआय भामट्यांनी १७ लाख उकळले

मनी लॉड्रींगच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी, पोलिसांच्या वर्दीत चार भामट्यांनी केली महिलेची स्काईपवरून ऑनलाईन चौकशी

छत्रपती संभाजीनगर : सीबीआय ऑफिसर बोलत असून तुमचा मनी लॉंड्रींग प्रकरणात सहभाग असल्याची थाप मारत एका महिलेकडून तब्बल १७ लाख रूपयांची फसवुणक केली. व्हॉटसअप एक स्काइप ॲप पाठवून ते इन्स्टॉल करण्यास सांगुन त्यावरून व्हिडिओ कॉन्फन्सिंग द्वारे चार ते पाच तास झाडाझडती घेवून गंडवले. शुक्रवारी २६ जुलैला याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात सायबर चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

फसवणुक झालेली ३६ वर्षीय महिला ही बीडबायपास भागात राहते. महिलेचे पती एका खाजगी कंपनीत उच्चपदस्य अधिकारी आहेत. १ मार्च २०२४ ला महिलेला अनोळखी क्रमांकावरून कॉल आला की, तुमच्या आधारकार्डवरील एका मोबाइल नंबरवरून त्रासदाय व बेकादेशीर जाहिराती आल्या आहेत. महिलेने नकार दिल. तुमचे आधार कार्ड वापरून कोणीतरी सीमकार्ड खरेदी केले आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन तक्रार करा. असे सांगितले. त्यावर सायबर चोरट्याने महिलेच्या व्हॉटसॲपवर स्काइप अूॅप पाठवून ते इन्स्टॉल करण्यास सांगितले. महिलेने ॲप इन्स्टॉल करण्यास नकार दिल्याने तुम्हांला मुंबईतील सार पोलिस ठाण्यात हजर होवून तक्रार द्यावी लागेल अशी धमकी दिली. मूहिलेने ॲप इन्स्टॉल केल्यानंतर एक आयडी दिला. तो आयडी टाइप केल्यानंतर खाकी वर्दी घातलेला एक तोतया अधिकारी दिसला. पाठीमागे पोलिस ठाण्याचा बोर्ड असल्याने महिलेचा विश्वास पटला.

जागेवरून उठायचं नाही ; तुम्हाला व्हर्च्युअल अरेस्ट केलंय
पुढील तोतया अधिकार्याने सांगितले आमचे सिनीअर ऑफिसर येतील ते विचारपुस करतील. सीबीआय ऑफिसर असल्याचे चोरट्याने सांगितले. तुमच्या प्रकरणात मनी लॉड्रींगचा प्रकार संशय येतोय. काही पुरावे व कागदपत्रे भामट्याने महिलेला स्काइप ॲपच्या माध्यमातुन पाठवले. महिलेने नकार दिला तरी भामट्याने तुमची केस प्राधान्याने बघत आहोत. त्यामुळे वरीष्ठ अधिकारी बोलतील तुमची व्हर्चुअल अरेस्ट केली आहे. जागेवरून उठल्यास स्थानिक पोलिस पाठवून अटक करण्याची धमकी दिली.

दोन तासात अटक करण्याची धमकी
सायबर चोरट्याने फिर्यादी महिलेस धमकावण्यास सुरूवात केली. त्यानंतर एक तोतया महिला अधिकाऱ्याने चौकशी सुरू केली. तुमचे अरेस्ट वाॅरंट काढण्यात आले असूुन दोन तासात तुम्हाला अटक करण्याची धमकी दिली. अटक टाळायची असेल तर तुम्हाला या खात्यात पैसे भरावे लागतील असे सांगितले. फिर्यादी महिलेने मला हा प्रकार माझ्या पतीला सांगावा लागेल त्यावर सायबर चोरटे म्हणाले की हे नॅशनल सिक्रेट असून तुम्हाला ९० दिवसांच्या कस्टडीत ठेवले जाईल अशी धमकी दिली.

एफडी मोडून सायबर भामट्याना पाठवले पैसे
घाबरलेल्या महिलेला ऑनलाइन व्यवहार येत नसल्याने तीने बॅक खात्यात जावून पैसे भरण्याचा निर्णय घेतला. दुसर्या दिवशी २ मार्चला महिलेने सेंट्रल बॅकमधुन २ लाख २८ हजार रूपये भरले.त्यानंतर पुन्हा विविध कारणे दाखवून महिलेला धमकावण्यास सुरूवात केली. तुमच्या खात्यात जेवढे पैसे असेल तेवढे टाका असे म्हणाल्यानंतर महिलेने १५ लाख रूपयांची एफडी मोडून सायबर चोरट्यांच्या खात्यात भरले. मागील काही दिवसानंतर महिलेला तीच्या पतीने विचारल्यास तीने असा प्रकार घडल्याची सांगितले. त्यावरून महिला व तीच्या पतीने सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button