क्राइममहाराष्ट्र
गुन्ह्यात मदत करण्यासाठी २५ हजारांची लाच, पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल

सांगोला : प्रतिनिधी- पोलीसात दाखल केलेल्या गुन्ह्यात कलम वाढ न करता, अटक न करता जामिनावर सुटका करण्यासाठी व तपासात कामात मदत करण्यासाठी २५ हजारांची लाच खाजगी इसमामार्फत स्विकारल्या प्रकरणी, पोलीस कर्मचारी व खाजगी इसम अश्या दोघांच्या विरोधात सांगोला पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई दिनांक २२ जुलै रोजी दुपारच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर पथकाने केली, असून
पो. कॉ. सोमनाथ बबन माने नेमणूक सांगोला पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण व खाजगी इसम अक्षय दत्तात्रय पवार रा. वाटंबरे ता. सांगोला असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचे व त्यांच्या मुलावर सांगोला पोलीसात दाखल असलेल्या गुन्हामध्ये कलम वाढ न करून, अटक न करता जामीनावर सोडवण्यासाठी व गुन्ह्यात तपास कामात मदत करण्यासाठी पो. कॉ. सोमनाथ माने, नेमणुक सांगोला पोलीस ठाणे यानी प्रथम ४५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागास प्राप्त झाली होती.
त्यानुसार दिनांक २२ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणी कारवाईमध्ये प्रथम ३० हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २५ हजार रुपये लाच रक्कम पो. कॉ. सोमनाथ माने यांनी स्वीकारण्याचे तयारी दर्शवून, सदरची २५ हजार रुपये लाचेची रक्कम खाजगी इसम अक्षय दत्तात्रय पवार यांच्या हस्ते स्वीकारले असल्याने दोघांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई गणेश कुंभार (पोलीस उपअधीक्षक) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर, पोलीस अंमलदार स.पो.फौ. कोळी, पो .हे .कॉ. सोनवणे, पो.कॉ.किणगी, चा.पो. गायकवाड यांच्या पथकाने अमोल तांबे (पोलीस अधीक्षक) ला. प्र. वि पुणे, डॉ. शीतल जानवे- खराडे (अप्पर पोलीस अधीक्षक) ला.प्र.वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.