क्राइममहाराष्ट्र

पत्नीच्या नावे ३० फॉर्म भरले, २६ अर्जांचे पैसे बँक खात्यात जमाही झाले

 

नवी मुंबई : लाडकी बहिण योजनेत एका व्यक्तीने पत्नीच्या नाव ३० अर्ज भरले आिण आश्चर्य म्हणजे २६ अर्जांचे पैसेही बँकेत जमा झाले. एकाच महिलेच्या नावे ३० वेगवेगळे अर्ज, वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करुन एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर करत मिळणारी रक्कम लाटल्याचा प्रकार घडला आहे. साताऱ्यातील ही घटना असून या प्रकरणात सहकारी बँकेच्या खात्यात आतापर्यंत २६ अर्जांची रक्कम जमा झाली आहे.

या प्रकरणातील संबंधित व्यक्तीनं एकाच पत्नीचा फोटो वेगवेगळ्या पोशाखात काढून २७ महिला असल्याचं दाखवलं असल्याचं देखील उघड झालं आहे, या प्रकरणी पनवेल तहसिलदार कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

खारघर येथील रहिवासी असलेल्या पूजा महामुनी यांचा अर्ज दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरुन दाखल करुन मजूंर करण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. महामुनी यांनी पनवेलमधील भाजपचे माजी नगरसवे निलेश बाविस्कर यांना अर्ज दाखल करण्यासाठी २८ ऑगस्ट रोजी मदत मागितली. २९ ऑगस्टला महामुनी यांनी मोबाईल नंबर नोंदवून लॉगीन करण्याचा प्रयत्न केला असता लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल आणि मंजूर करण्यात आल्याची माहिती दाखवण्यात आली, यामुळं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

निलेश बाविस्कर यांनी यानंतर अधिक चौकशी करुन त्या मेसेजमध्ये मिळालेल्या फोन नंबरवर फोन केला असता संबंधित व्यक्तीनं तो सातारा येथील असल्याचं सांगितलं. संबंधित व्यक्तीला निलेश बाविस्कर यांनी ओटीपी शेअर करायला सांगितला, त्या व्यक्तीनं तो दिला देखील.

निलेश बाविस्कर यांनी सामाजिक कार्यकर्त्या कांचन बिर्ला यांच्या मदतीनं माहिती घेतली असता ३० लाभार्थी महिलांची खाती एकाच मोबाईल नंबरला लिंक करण्यात आल्याचं समोर आलं. त्या पैकी २७ लाभार्थ्यांचं नाव एक सारखं होतं मात्र आधार कार्ड नंबर वेगवेगळे होते. यापैकी २६ अर्ज मंजूर झाले असून चार अर्ज मंजूर झालेले नाहीत. यामुळं महामुनी, बिर्ला आणि बाविस्कर यांनी पनवेल तहसिलदारांकडे तक्रार दिली. संबंधित व्यक्तीनं पासवर्ड देखील बदलले असल्याचं समोर आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button