क्राइम

तरुणीच्या मृतदेहाचे ३२ तुकडे फ्रिजमध्ये ठेवले, आरोपीची ओळख पटली

बंगळुरूमध्ये एका तरुणीच्या मृतदेहाचे ३२ तुकडे फ्रिजमध्ये ठेवल्याचं आढळलं. हे तुकडे पूर्णपणे सडले होते. तरुणीची हत्या करुन १० दिवस आधी मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले होते, पण या हत्येची कोणालाही माहिती मिळाली नव्हती.

बंगळुरूमध्ये २९ वर्षीय तरुणीची तिच्या घरातच हत्या करण्यात आली. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता हे प्रकरण समोर आलं. तरुणीची हत्या झाली त्या परिसरात अतिशय दुर्गंध येत होता. तरुणी राहत असलेल्या घरमालकाने मृत तरुणी महालक्ष्मी दासच्या आईला आणि मोठ्या बहिणीला बोलावल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. महालक्ष्मी दास एका मॉलमध्ये काम करत होती. तिने व्यालिकावलमध्ये एका इमारतीमध्ये भाड्याने फ्लॅट घेतला होता. ती फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. इमारतीचे मालक जयराम हे त्याच इमारतीमध्ये तळमजल्यावर राहत होते.

शनिवारी एका शेजाऱ्याने इमारतीच्या मालकांना जयराम यांना त्यांच्या इमारतीमधून दुर्गंध येत असल्याचं सांगितलं. त्यानंतर जयराम यांनी महालक्ष्मीच्या आईला आणि मोठ्या बहिणीला फोन केला आणि महालक्ष्मीबाबत माहिती काढण्याचं सांगितलं.

आई आणि बहीण महालक्ष्मीच्या घरी पोहोचले, तेव्हा दरवाजा बाहेरुन बंद होता. ज्यावेळी दरवाजा तोडला, त्यावेळी जमिनीवर किडे दिसले. खोलीतून दुर्गंध येत होता. त्यांना महालक्ष्मीच्या १६५ लीटर सिंगल डोअरच्या फ्रिजमधून किडे बाहेर येताना दिसले. फ्रिजमधून किडे येताना पाहिल्यानंतर त्यांना फ्रिजमध्ये काही सडलेलं असल्याचं जाणवलं. त्यांनी फ्रिज उघडला आणि समोर सडलेल्या मृतदेहाचे तुकडे दिसले. दोघीही ते पाहून बेशुद्ध झाल्या.

खुनाच्या संशयिताची ओळख पटली
बेंगळुरूचे पोलीस आयुक्त बी दयानंद म्हणाले की, महिलेच्या हत्येतील मुख्य संशयिताची ओळख पटली असून त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. मुख्य संशयिताची ओळख पटली असून त्याच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत. तो बाहेरचा माणूस आहे. आम्ही आत्ता अधिक माहिती देऊ शकत नाही कारण ती आरोपींना मदत करू शकते. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री जी परमेश्वरा म्हणाले की, पोलिसांना महिलेच्या मृत्यूबाबत अनेक पुरावे मिळाले आहेत, मात्र त्याबाबत सांगणे कठीण आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button