देश-विदेश

५२ वर्षीय ‘ब्युटीफूल गव्हर्नर’चे ५८ जणांशी शारिरीक संबंध, सरकारी पैशावर प्रियकरांसोबत करायची पर्यटन

चीनमधील ५२ वर्षीय ‘ब्युटीफूल गव्हर्नर’ने तिच्या ५८ कनिष्ठ कर्मचाऱ्यांसोबत प्रेमसंबंध ठेवल्याची तसेच ७१ कोटी रुपयेची लाच घेतल्याचं सिद्ध झालं आहे. झोंग यांग असे त्या महिलेचे नाव आहे. तिला मागील वर्षी एप्रिल महिन्यामध्ये बडतर्फ करण्यात आलं होतं. आता झोंग यांगबद्दल नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार, तिला १३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

झोंग यांग या गोईंझू प्रांतात गव्हर्नर तसेच उपसचिव म्हणून कार्यरत होती. वयाच्या २२ व्या वर्षी झोंग यांगने सक्रीय राजकारणात प्रवेश केला. तिने चायनिज कम्युनिस्ट पार्टीमधून राजकारणात प्रवेश केला. तिने नॅशनल पिपल्स काँग्रेसचं उपाध्यक्षपदही भुषवलं आहे. मजल दरमजल करत ती राजकारणात यश मिळवत गेली.

स्थानिक प्रसारमाध्यांनी दिलेल्या माहितीनुसार, झोंग यांगला 13 वर्षांचा तुरुंगवास आणि एक मिलियन युआनचा दंड ठोठावण्यात आला आहे. “58 सहकाऱ्यांबरोबर लैंगिक संबंध ठेवणे आणि 60 मिलिअन युआन लाच म्हणून स्वीकारल्याप्रकरणी शिक्षा सुनावली जात आहे,” असं सांगण्यात आलं आहे. नैऋत्य चीनमधील प्रांतात नियुक्त असलेली झोंग यांग ही तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तिने यापूर्वी केलेल्या खुलाश्यामध्ये आपण अविवाहित असून आपल्याला मूलबाळ नाही असं सांगितलं होतं.

आपल्या कामाच्या ठिकाणी अनेक पुरुषांबरोबर झोंग यांगचे लैंगिक संबंध असल्याचं सिद्ध झालं आहे. ‘ओव्हर टाइम’, ‘ऑफिसचे दौरे’ या नावाखाली ती तिच्या ऑफिसमधील प्रियकरांबरोबर वेळ घालवण्याचे बहाणे शोधायची. सरकारी पैशावर ती प्रियकरांबरोबर फिरायला जायची असाही आरोप आहे.

‘नेटइज न्यूज’ला पूर्वी झोंग यांगने दिलेल्या मुलाखतीमध्ये, काही पुरुष मला त्यांची प्रेयसी म्हणून निवडतात कारण मी त्यांच्यासोबत असल्यास त्यांना बरेच फायदे होतात, असा दावा केलेला. तसेच पुढे बोलताना, काही पुरुष माझं पद बघून घाबरुन माझ्याबरोबर संबंध ठेवण्यास तयार होतात, असं स्वत: झोंग यांगने सांगितलं होतं. झोंग यांगचे एकूण 58 प्रियकर होते असं तपासात समोर आलं आहे. अनेकदा ती क्लबमध्ये दिसून यायची. “झोंग यांग अनेकदा खासगी नाईटक्लबमध्ये दिसून यायची. तिच्या हॅण्डबॅगमध्ये कायम कंडोम असायचे,” असं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button