आजपासून जन्माला येणार मुल असेल Generation Beta; Gen Z आणि Alpha चा काल संपला
या जगात प्रत्येक वेळी एक नवीन पिढी येत असते. त्यांच्याबद्दल बोलणे सोपे व्हावे म्हणून या पिढ्यांना वेगवेगळी नावे दिली जातात. जसे तुम्ही जनरेशन झेड किंवा अल्फा जनरेशन बद्दल तुम्ही नक्कीच ऐकले असेल. आता त्याच प्रकारे, 2025 पासून जन्मलेल्या पिढीला जनरेशन बीटा म्हटले जात आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर जनरेशन बीटा ही एक नवीन पिढी आहे जी आता येणाऱ्या नवीन वर्षाने सुरू होत आहे.
त्याला असे नाव पडले कारण त्याच्या आधी अल्फा नावाची पिढी होती. सामाजिक संशोधक मॅकक्रिंडल यांच्या मते, हा नामकरणाचा एक मार्ग आहे ज्यामुळे इतिहासात एक नवीन युग सुरू होत आहे.
जनरेशन ठरवण्याची पद्धत त्या कालखंडातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटनांवरून रूढ झाली आहे. सर्वसाधारपणे एखाद्या पिढीसाठी 15-20 वर्षांचा कालावधी ग्राह्य धरला जातो. पिढ्यांना नाव देण्याची ही पद्धत नक्की काय आहे व तुमच्या जनरेशनला कोणत्या नावाने ओळखले जाते? याविषयी जाणून घेऊया.
द ग्रेटेस्ट जनरेशन (GI जेनरेशन): 1901-1927
या काळात जन्माला येणाऱ्यांना The Greatest Generation नाव देण्यात आले आहे. या काळातील जनरेशनमधील बाळांना ग्रेट डिप्रेशनचा सामना करावा लागला. तसेच, हीच मुले पुढे जाऊन सैनिक झाली व त्यांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला. त्यामुळे या पिढीला जीआय जनरेशन म्हणून ओळखले जाऊ लागले.
द सायलेंट जनरेशन: 1928-1945
महामंदी आणि दुसरे महायुद्ध यामुळे या काळात जन्माला आलेल्या मुलांना The Silent Generation म्हणून ओळखले जाते. या पिढीतील मुले कष्टाळू आणि स्वावलंबी होती.
Baby Boomer generation: 1946-1964
दुसऱ्या महायुद्धानंतर अचानक लोकसंख्येत प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय, आधुनिकतेचा देखील मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. तंत्रज्ञानाचा देखील वापर वाढला. त्यामुळे या वर्षांमध्ये जन्माला आलेली मुलं Baby Boomer generation आहेत.
जनरेशन एक्स: 1965-1980
जनरेशन एक्सच्या काळात तंत्रज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. इंटरनेटमुळे जग पूर्णपणे बदलून गेले. मुलांना खेळण्यासाठी व्हीडिओ गेम्स आल्या. या काळातील पालकांनी मुलांना सर्व सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला.
मिलेनियल्स अथवा जनरेशन वाय: 1981-1996
जनरेशन Y लाच मिलेनियल्स म्णून ओळखले जाते. 21व्या शतकाच्या आधी जन्माला आलेली ही पिढी होती. या पिढीतील मुलांना तंत्रज्ञानासोबत स्वतःला बदलले.
जनरेशन Z: 1997-2009
या वर्षांमध्ये जन्म झालेल्या मुलांसाठी इंटरनेट आणि सोशल मीडिया सहज उपलब्ध होते. सोशल मीडियावर सक्रिय होणारी ही सर्वात तरूण पिढी होती. स्मार्टफोनचा देखील वापर वाढला होता. 1997 ते 2009 या वर्षांमध्ये जन्म झालेल्या मुलांना जनरेशन Z म्हणून ओळखले जाते.
जनरेशन अल्फा: 2010-2024
सोशल मीडिया आणि इंटरनेट प्लॅटफॉर्म आधीपासूनच उपलब्ध असलेली ही पहिलीच पिढी होती. या बाळांचे पालक देखील इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा वापर करत मोठे झाले.
जनरेशन बीटा: 2025-2039
1 जानेवारी 2025 पासून नवीन जनरेशनला सुरूवात झाली आहे. 2025 – 2039 या काळात जन्माला येणारी मुलं ‘बीटा किड्स’ म्हणून ओळखली जाते. या मुलांच्या आयुष्यावर तंत्रज्ञानाचा मोठा प्रभाव असेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही (AI) वापर वाढेल. यांच्या काळात सोशल मीडिया पूर्णपणे बदलून जाईल. या पिढीच्या काळातच रोबॉटिक्सच्या क्षेत्रातही मोठी क्रांती झाल्याचे दिसून येईल. या पिढीला लोकसंख्येतील बदल, ग्लोबल वार्मिंग, प्रदूषण, संसाधनांचा ऱ्हास आणि पर्यावरणाची हानी सारख्या सामाजिक गोष्टींनाही सामोरे जावे लागेल. याशिवाय, या पिढीतील बहुतांशजण 22व्या शतकात देखील असतील.