चार ट्रक आणि बस अशा पाच वाहनांचा विचित्र अपघात, एक ठार
नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यातील कोंडाईबारी घाटात विचित्र अपघात होऊन एक जण ठार तर १५ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या विचित्र अपघातात चार ट्रक आणि सुरत-अमळनेर बस समावेश आहे. या अपघातात दोन चालक केबिनमध्ये अडकले आहे. अपघातात एक ठार तर १५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटामध्ये चार ट्रक आणि एक बस अशा पाच वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रक चालक केबिनमध्ये अडकले असून गुजरात राज्यातील सुरत अमळनेर बस मधील आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहे. तसेच ट्रकमधील ही चालक जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेतून दाखल करण्यात आले आहे.
या अपघात एक ट्रक आिण दोन तेल टँकरचा अपघात घडला होता. तेलाचे टँकर रस्त्यावर उलटल्यामुळे संपूर्ण तेल महामार्गावर पडल्याने अनेक ट्रक तिथं घसरून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या अपघातामुळे वाहनांचे आणि मुद्देमालाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर केबिनमध्ये अडकलेल्या ट्रक चालक सहचालक त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन केले. गुजरात राज्यातील बस अपघातग्रस्त झाल्याने जखमी प्रवाश्यांना रूग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पर्यायी रस्त्याने वाहतूक वळून वाहतूक सुरळीत सुरू केली आहे. घाटात वारंवार होणाऱ्या अपघाताबाबत संबंधित विभागाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.