क्राइम

मॉर्निंग वॉक करणाऱ्या तरुणीची टोळक्याकडून छेडछाड; लाथा बुक्क्याने मारहाण करत पोट व हातावर केले चाकूने वार

बदनापूर / परवीन सय्यद
चित्रपटात ज्या पद्धतीने एखादी अभिनेत्री रस्त्यावर वाकिंग करीत असते आणि पाठीमागून काही खलनायक मोटारसायकलवर येऊन तिचा हात धरून विनयभंग करतात अशीच काहीशी घटना १२ सप्टेंबर रोजी निकलक शिवारात घडली असून सकाळच्या वेळेस रस्त्यावर रनिंग करणाऱ्या एका तरुणीला तीन मोटरसायकल वर पाठीमागून अज्ञात सहा जण येऊन तिचा हात धरत ओढून विनयभंग करीत तिला लाथा बुक्क्याने मारहाण केली व पोटावर हातावर चाकूचे वार करून गंभीर जखमी केले. सदर घटना सकाळी ५;३० वाजेच्या सुमारास घडल्याने बदनापूर तालुक्यात पोलिसांचा धाक राहिलेला नाही हे सिद्ध होत आहे.

बदनापूर शहरासह तालुक्यात गुन्हेगारीचेव प्रमाण प्रचंड वाढले आहे, काही दिवसांपूर्वी चक्क बदनापूर पोलीस ठाण्यासमोर काही लोकांनी फिर्यादीला बेदम मारहाण केली अश्या दोन घटना मागील दोन महिन्यात घडल्या आहेत, त्याच बरोबर वाळू माफियांनी देखील पोलिसांवर हल्ले केल्याच्या घटना मागील सहा महिण्यात घडल्याने गुन्हेगारावर बदनापूर पोलिसांचा वचक राहिलेला नाही हे उघड असतांना जिल्हा पोलीस अधीक्षक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

१२ सप्टेंबर रोजी तर चक्क हिंदी चितपटाप्रमाणे बदनापूर तालुक्यातील निकलक परिसरात घटना घडली असून सकाळी ५:३० वाजेच्या सुमारास चक्क एका तरुणीला चाकूने वार करून जखमी करण्यात आल्याने गुन्हेगारांचे धाडस किती वाढले यावरून सिद्ध होते. निकलक येथील एक तरुणी सकाळी वाल्हा रोडवर रनिंग करीत असतांना तीन मोटारसायकलींवर अज्ञात सहा जण आले व त्यांनी सदर तरुणीचा हात ओढून तिला खेचत नेत तिच्या पोटावर ,हातावर पायावर चाकूचे वार करून गंभीर जखमी केले. सदर तरुणीच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए. जी. जैस्वाल हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button