महाराष्ट्रराजकारण

मटणाच्या फोडीसाठी भाजपा कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी

मिर्झापूर : िनवडणुकीत सर्वात अवघड गोष्ट म्हणजे कार्यकत्याच्या सोय करणे. अन् नेते मंडळीही त्यांची सोय करण्यात कोणतीच कसर सोडत नाही. मात्र दरवेळेस या कार्यकर्त्यांच्या मागण्या नेत्यांना पूर्ण करता येतातच असं नाही. बरं यासाठी केवळ निवडणुकीच्या प्रचारात नाराजी असते असंही नाही. कार्यकर्त्यांच्या नाराजीचं आणि त्यांनी वाद घालण्याचं कारण काहीही असू शकतं. असाच प्रकार एका भाजपा खासदाराने आयोजित केलेल्या मेजवानीमध्ये घडला. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये झालेला राड्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

भाजपाचे उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरचे खासदार विनोद बिंद यांनी मेजवानची आयोजन केलं होतं. यासाठी जेवायला आलेल्या पाहुण्यांना आणि कार्यकर्त्यांना जेवण वाढताना मटणाचे खडे काही मिळाले नाहीत. 14 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या मेजवानीमध्ये हजारो लोकांना आमंत्रण होतं. खासदाराकडून मेजवाणीचं आमंत्रण आल्याने पंचक्रोषीतून या ठिकाणी लोकांनी गर्दी केली. मात्र मटण वाढताना अनेकांना केवळ रस्साच वाढण्यात आला. आता मटणाचा तुकडा न मिळाल्याने अनेकांनी जाब विचारला. मात्र त्यावर उलट उत्तर मिळाल्याने आधी शा‍ब्दिक वाद सुरु झाला आणि त्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. खासदाराच्या भावाने मटणाचे तुकडे कुठे आहेत? या प्रश्नाकडे दूर्लक्ष करत रस्सा वाढणं सुरु ठेवल्याने पाहुणे अधिक संतापले.

यानंतर आयोजक खासदाराचे समर्थक आणि पाहुणे यांच्यामध्ये तुफान हाणामारी झाली. मटणाचे तुकडे का वाढले नाही यावरुन अनेकजण एकमेकांवर धावून गेले. एकमेकांना बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतरचे कार्यक्रम स्थळावरील व्हिडीओ आता समोर आले आहेत. कछवा पोलीस स्थानकाअंर्गत येणाऱ्या करसडा येथे विनोद बिंद यांचं कार्यालय आहे. या पोलीस स्थानकात सदर प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button