नग्न अवस्थेत रस्त्यावरुन चालतानाचा दाम्पत्याचा व्हीडिओ व्हायरल, उपराजधानीतील घटना
नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूूरात काही दिवसांपूर्वी अश्लिल चाळे करतानाचे व्हीडिओ समोर आले होते. आता असाच एक व्हीडिओ समोर आला असून नागपूरमध्ये एक दाम्पत्य रस्त्यावर नग्नावस्थेत चालत असल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. नग्नावस्थेतील हा व्हिडीओ दुचाकीस्वारांनी रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमध्ये पती-पत्नी दोघेही नग्नावस्थेत असून पत्नी पतीच्या मागे धावताना दिसत आहे. दरम्यान, हे दाम्पत्य मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे.
या व्हिडीओत एक दाम्पत्य नग्न अवस्थेत रस्त्यावर चालत आहे. पती घराबाहेर नग्न निघाला असता पत्नीही त्याच्या मागे तशाच अवस्थेत निघाली. व्हिडीओमध्ये पती पुढे पुढे जाताना दिसतोय. तर पत्नीदेखील नग्नावस्थेतच त्याच्या मागे मागे धावताना दिसत आहे. ही घटना लक्ष्मीनगर चौक ते माटे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर 27 जुलैच्या रात्री घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
या व्हायरल व्हिडीओची पोलिसांनीही तत्काळ दखल घेतली. बजाजनगर पोलिसांनी दाम्पत्याचा शोध घेत त्यांना ठाण्याला बोलावले. तेव्हा कुटुंबियांकडून ते मानसिक रूग्ण असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल न करता दाम्पत्याला उपचारासाठी पाठवण्याचा सल्ला पोलिसांनी दिला.
काही दिवसांपूर्वी नागपूरमध्येच असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये प्रियकर-प्रेयसी धावत्या कारमध्ये अश्लील चाळे करताना दिसत होते. हे दोघेही ड्रायव्हिंग सिटवर बसून हा प्रकार करत होते. नागपूरच्या धरमपेठ भागात ही घटना घडली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी व्हायरल प्रियकर-प्रेयसीवर कारवाईचा बडका उगारला होता. सीताबर्डी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी सूरज राजकुमार सोनी हा सनदी लेखापाल आहे. तर त्याची प्रेयसी अभियंता आहे.
कारमधील अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांनी दुचाकीवर अश्लील चाळे करतानाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत कुख्यात गुंड दिसत होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तशी माहिती पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी दिली होती.