क्राइममहाराष्ट्र

पुण्यात आढळला पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये तरुणाचा मृतदेह

पुणे : तरुणाचा खून करुन मृतदेह खोक्यात बांधून फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हडपसर भागातील हिंगणे मळा परिसरातील कालव्याजवळ खोके सापडले. खून झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही.

हिंगणे मळा परिसरात शुक्रवारी सायंकाळी एक खोके नागरिकांनी पाहिले. तरुणाचे हात पाय बांधण्यात आले. खोके बंद करून ते कालव्याजवळ असलेल्या मोकळ्या जागेत फेकून देण्यात आले होते. याबाबतची माहिती रहिवाशांनी पोलिसांना दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहाेचले. खून झालेल्या तरुणाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष आहे. त्याची ओळख पटलेली नाही. खून झालेल्या तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती हडपसर पाेलिसांनी दिली.

कचऱ्यात बॉक्समध्ये मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी हडपसर पोलिसांनी धाव घेतली. तिथली परिस्थिती पाहून पोलिसांनाही आश्चर्य झालं. एका पुठ्ठ्याच्य बॉक्समध्ये एका तरुणाचा मृतदेह बांधून भरण्यात आला होता. त्याला प्लास्टिकने कव्हर करण्यात आलं होतं. पोलिसांनी बॉक्समधील मृतदेह काढून ससून रुग्णालयात पाठवला. त्यानंतर सदर अज्ञात व्यक्तीचा मृत्यू कुठे आणि कसा झाला याबाबत हडपसर पोलीस तपास करीत असून, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांनी सांगितलं की, हडपसर हिंगणे मळा येथील कॅनॉलच्या शेजारी कचऱ्याचा ढिगारा आहे. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास येथील कचऱ्यामध्ये भंगार गोळा करणारी व्यक्ती भंगार शोधत होता. तिथे त्याला एक पुठ्ठ्याचा बॉक्स दिसून आला. त्या बॉक्समध्ये काय आहे, हे पाहण्यासाठी त्याने तो बॉक्स एका बाजूने उघडून पाहिला. त्यावेळी त्याला धक्का बसला, बॉक्समध्ये मनुष्याचा चेहरा दिसून आला. घाबरलेल्या भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीने इतर नागरिकांच्या मदतीने पोलिसांना कळवले.

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन सदर पुठ्ठ्याचा बॉक्स उघडला असता त्यामध्ये पुरुष जातीचा अंदाजे २५ ते ३० वयोगटाचा इसम दोरीने बांधलेले अवस्थेत होता. पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलवून सदर इसमाला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच सदर व्यक्ती मयत असल्याचे सांगितले. सदर व्यक्तीचा मृत्यू कुठे आणि कसा घडला, कचऱ्याच्या ढिगाऱ्या शेजारी कोणी आणून टाकला. याबाबत हडपसर पोलीस ठाण्याचे तपास पथक तपास करीत असून, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button