सुमारे ११ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त ; सांगोला येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल

सांगोला (प्रतिनिधी) : सांगली स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आटपाडी येथे प्रतिबंधित गुटखा प्रकरणी कारवाईचा ‘झटका’ देत, विविध कंपनीचा सुगंधी तंबाखू, गुटखा व वाहन असा सुमारे ११ लाख २२ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पो. कॉ. सुनिल रघुनाथ जाधव (नेमणूक स्था.गु.अ. शाखा, सांगली) यांनी आटपाडी जि. सांगली पोलीस स्टेशनमध्ये नवाज बादशाह मुलाणी रा. एखतपूर रोड, बनकर वस्ती, सांगोला व जुबेर जमीर मुलाणी रा. एखतपूर रोड, पुजारवाडी, सांगोला यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ११ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखे कडील स. पो.नि. सिकंदर वर्धन, पो. हे.कॉ. संजय पाटील, सुर्यकांत साळुंखे, हणमंत लोहार, पो. कॉ. प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, सुरज थोरात, चालक पो. कॉ. सुशांत चिले असे पथक सतीश शिंदे (पोलीस निरीक्षक) यांच्या आदेशाने विटा उपविभागामध्ये आटपाडी पोलीस ठाणे हद्दीत अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांच्या विरुध्द कारवाई करण्यासाठी गस्त करताना आटपाडी बसस्टॅण्डवर आले.
यावेळी पथकास गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दिघंची -आटपाडी रोडने कारखाना फाटा येथे एक पांढ-या रंगाची चारचाकी महिंद्रा सुप्रो मॅक्सीट्रक गाडी क्र. एम.एच. 45 ए.एफ. 4502 ने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व शासनाने निर्बंध केलेले सुगंधी गुटखा कारखाना फाटाहून आटपाडीकडे नेहणार आहे, अशी खात्रीशीर बातमी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास मिळाली.
सदर पथकाने दिघंची -आटपाडी रोडवरील कारखाना फाटा येथे सापळा लावला, तेव्हा साडे सात वाजण्याच्या सुमारास एक पांढ-या रंगाची चारचाकी महिंद्रा सुप्रो मॅक्सीट्रक गाडी येत असल्याची दिसली.
सदर गाडीस थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा आढळून आला. टेम्पोतील दोघांना पोलिसांनी त्याचे नाव ,गाव विचारले तेव्हा त्यानी त्याचे नाव नवाज बादशाह मुलाणी व जुबेर जमीर मुलाणी असे असलेचे सांगितले. तसेच गाडीतील सर्व माल सांगोला येथील अभिजीत मस्के यांच्याकडून आणून आटपाडी परीसरात विक्रीसाठी घेवून जात असल्याचे सांगितले, असे फिर्यादीत म्हंटले आहे.