बोपदेव घाट सामुहिक अत्याचारप्रकरणातील आरोपी सीसीटीव्हीत कैद
पुण्यातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. एका सीसीटीव्हीत आरोपी कैद झाले असून, हे सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलं आहे. तसेच पोलिसांनी याआधी आरोपींचं स्केच जारी केलं असून, नागरिकांना ते दिसल्यास माहिती देण्याचं आवाहन केलं आहे.
सदर तरुणी मित्रांसोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा घाटात गेलेल्या दोघांजवळ तीन तरुणांनी तरुणीचे अपहरण केले. व तिच्यावर अत्याचार केला.
पोलिसांनी ज्या मार्गावर ही घटना घडली तेथून जाणाऱ्या सर्व संशयित वाहनांची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. यावेळी त्यांना एका दुचाकीवरुन तिघे प्रवास करत असल्याचं दिसलं. घटनेत तीन आरोपी असल्याने पोलिसांचा संशय बळावला. सीसीटीव्हीत ते एका ठिकाणी थांबले असल्याचं दिसत आहे. आता पोलीस वाहनाच्या आधारे त्यांची माहिती मिळवत आहेत.
पीडित तरुणी मित्रासह फिरण्यासाठी बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा तिघेजण तिथे आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याच सांगून त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. त्यानंतर संबंधित तरूणीला कारमधे बसवून कार येवले वाडी भागातील एका गल्लीत नेण्यात आली. तिथे या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केले, अशी माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांनी 10 पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केले आहेत.