मुंबई: मल्याळम इंडस्ट्रीमधील महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या हेमा कमिटीचा अहवाल समोर आला आहे. यानंतर अनेक महिला कलाकार समोर येऊन आपल्याला आलेले अनुभव शेअर करत आहेत. यामध्ये अभिनेत्री मिनू कुरियनचाही समावेश आहे. मिनूने एक फेसबुक पोस्ट शेअर केली असून यामध्ये तिने मल्याळम चित्रपटसृष्टीतील काही अभिनेते आणि तंत्रज्ञांवर शारिरीक आणि शाब्दिक छळ केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी कायदेशीर पाऊलही उचलण्यात आलं आहे.
यानंतर एकंदरितच सिनेविश्वात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक अभिनेत्रींनी मल्याळम सिनेविश्वात घडलेल्या अशा जुन्या प्रकरणांविषयीही आवाज उठवला आहे. लैंगिक शोषणासंदर्भात हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर तर मल्याळम सिनेविश्वात मोठी खळबळ उडाली असून, आता याचे परिणामही दिसू लागले आहेत. मल्याळम सिनेविश्वाती ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल हेमा समितीचा अहवाल समोर आल्यापासून मौन धारण करुन होते. मल्याळम सिनेविश्वातील एक सुपरस्टार आणि ज्येष्ठ अभिनेते असूनही त्यांनी यावर भाष्य न केल्याने मोहनलाल यांच्यावर सोशल मीडियावर टीकाही झाली.ते या असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि त्याची 17 सदस्यांची कार्यकारी समिती होती.त्यांनी आता याचा राजीनामा दिला आहे.
मीनूने इडावेला बाबूवर मल्याळम मूव्ही आर्टिस्ट्स (AMMA) च्या सदस्यत्वाच्या बदल्यात शारिरीक सुख मागितल्याची ऑफर दिल्याचा आरोप केला होता. अलीकडेच ज्येष्ठ मल्याळम अभिनेते सिद्दीकी यांनी AMMA च्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. एका अभिनेत्रीने त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोपही केला होता.
माहितीनुसार, हेमा समितीच्या अहवालानंतर, नियामक मंडळाच्या काही सदस्यांवर लावण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची नैतिक जबाबदारी घेत AMMA च्या संपूर्ण प्रशासकीय समितीने राजीनामा दिला आहे. मल्याळम सिनेमाचे आयकॉन मोहनलाल हे या असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि त्याची 17 सदस्यांची कार्यकारी समिती होती.