बदलापूरनंतर पुण्यातही शाळेतच अत्याचार

पुणे : बदलापूर पाठोपाठ पुण्यातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर शाळेतील विद्यार्थ्यानेच अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील भवानी पेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला आहे.
हा प्रकार १५ ऑगस्टच्या दिवशीच हा घडला. पीडित मुलगी ही सातवीच्या वर्गातील असून आरोपी त्याच शाळेतील विद्यार्थी आहे. देवराज पदम आग्री असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो १९ वर्षाचा आहे. या तरुणाने शाळेतील स्वच्छतागृहात लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.
समर्थ पोलीस ठाण्यात देवराज आग्री विरोधात गुन्हा दाखल असून त्याला अटक ही करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या 30 वर्षीय आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे. तसेच शाळेतील स्वच्छतागृहाजवळ हा प्रकार घडल्याच उघड झालं आहे. या तरुणावर समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपी विरोधात 74, 75 (1) (i) पोक्सो 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशात सध्या कोलकाता अत्याचारप्रकरण गाजत आहे. तसेच महाराष्ट्रात बदलापूर येथे ३-४ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याने हे प्रकरण चांगले तापले आहे. त्यातच आता पुण्यातील हे प्रकरण उघडकीस आले आहे.