क्राइममहाराष्ट्र

अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी आव्हाडांची x वर ऑडिओ क्लिप शेअर : पोलिस व्हॅनमधून ठक असा आवाज आला अन्…

ठाणे : बदलापूर अत्याचारप्रकरणातील अक्षय शिंदेचा पोलिस एन्काऊंटरमध्ये म्रत्यू झाला. मुंब्रा परिसरात झालेल्या या चकमकीवर मुंबई उच्च न्यायालयानं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे मारला गेल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. पण पोलिसांनी सांगितेलल्या घटनाक्रमाबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे.

जितेंद्र आव्हाडांनी एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये एक कॉल रेकॉर्डिंग आहे. त्यात दोन व्यक्तींमधील संवाद आहे. त्यातील एक जण आपण एन्काऊंटर झालेल्या पोलीस व्हॅनच्या मागेच होतो. पोलीस व्हॅनमधून आलेले आवाज आपण ऐकले, असे दावे करत आहे. ‘अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका… निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती,’ असं म्हणत आव्हाडांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला आहे.

त्या क्लिपमधील संभाषण?

पहिला व्यक्ती : अस-सलाम-अलैकुम

दुसरा व्यक्ती : वा-अलैकुम-सलाम

पहिला व्यक्ती : भाई मी तुम्हाला एक व्हॉट्सअॅप मेसेज केला होता. पण नंतर मी घाबरलो आणि तो मेसेज डिलीट केला.

दुसरा व्यक्ती : का?

पहिला व्यक्ती: ते काय आहे ना.. अक्षय शिंदेचा जो मर्डर झाला ना, त्याच्या मागे माझीच गाडी होती. मी खूप घाबरलो. मी काही करू शकलो नाही. म्हटलं तुम्हाला सांगावं. काही चुकीचा मेसेज नको जायला. नाही तर माझ्या मागे लागतील.

दुसरा व्यक्ती : अच्छा.. व्हीडिओ होता का तुमच्याकडे?

पहिला व्यक्ती : नाही, व्हीडिओ तर नाहीये. पण मी आणि मेव्हणा एका रॅलीला जात होतो. मुंब्रा बायपासवरून जात होतो. आपण जो मुंब्र्याचा डोंगर चढतो ना, तिथे एक व्हॅन पाठीमागून आली. त्या व्हॅनला पडदे लावलेले होते. गाडीतून ठक करून आवाज आला. आम्हाला वाटलं की गाडीचा पाटा वाजला असेल. मग पुन्हा आवाज आला. मग मी घाबरलो. म्हटलं काही तरी इश्यू असेल. पोलिसांनी गाडी थांबवली. दरवाजा उघडला. दोन पोलीसवाले बाहेर आले. मग पुन्हा त्यांनी व्हॅन बंद केली. ते पुन्हा आत गेले. मग तिसरा आवाज आला. मग आम्ही घाबरलो. आम्ही त्यांना ओव्हरटॅक केला आणि तिथून पळून गेलो. ते कळव्याकडे गेले आणि आम्ही टी जंक्शनकडे गेलो. आता मी तुमच्याशी बोलतोय. मला भीती वाटतेय. पुढे काही अडचणी नको यायला.

दुसरा व्यक्ती : नाही. काही अडचण नाही येणार… अडचण का येणार?

पहिला व्यक्ती : मला वाटलं की गाडीचा पाटा वाजला असेल. गाडी थोडी उसळते ना. तर ठक असा आवाज आला. मग दुसऱ्यांदा ठक असा आवाज आला. मग तिसऱ्यांदा ठक. गाडीला पण सगळे पडदे लावले होते. माझा मेव्हणा पण घाबरला. म्हणाला चला इथून… आमचा मोबाईल बंद होता. आम्ही तर रॅलीला जात होता. मग आम्ही रॅलीवरुन परतलो. मोबाईल चालू केला. तेव्हा अक्षय शिंदेच्या बातम्या येत होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button