सर्व महापालिकांनी एक लाख झाडे लावावीत : मुख्यमंत्री
‘एक पेड माँ के नाम’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यात शुभारंभ

ठाणे : राज्यातील सर्व महापालिकांनी एक लाख झाडे लावावीत, असे निर्देश दिले असून त्याप्रमाणे सर्व महापालिका वृक्षारोपण करीत आहेत. पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने वृक्षारोपण करणे, ही भविष्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
तसेच प्रत्येक नागरिकांने आपल्या आईच्या नावे एक झाड लावावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माँ के नाम’ हे अभियाना सुरु केले आहे, त्यामुळे नागरिकांनी एक झाड लावावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केले. ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र वन विभाग, ग्रीन यात्रा आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने “मुख्यमंत्री हरित ठाणे १ लक्ष वृक्ष लागवड” या अभियानांर्गत “एक पेड मा के नाम” या अभियानाचा शुभारंभ वृक्षारोपण करून आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, लोकमान्य नगर येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.