क्राइमक्राइम स्टोरीदेश-विदेश

अन् त्याने बायकोसोबत लावला भावाचा विवाह

उत्तर प्रदेशातील जौनपूरमधील घटना

जौनपूर : बहादूर आणि सीमा यांचे गेल्या वर्षी मे महिन्यात लग्न झाले होते. दोघेही वैवाहिक जीवन एन्जॉय करत होते. दोघांमध्ये सर्व काही व्यवस्थित चालले होते. दरम्यान, पत्नी सीमा गरोदर राहिल्याने घरात वादळ उठले. हे मूल आपले नसल्याचे सांगून बहादूरने पत्नीला आपल्याकडे ठेवण्यास नकार दिला. बहादूरने त्याची पत्नी आणि त्याचा लहान भाऊ सुंदर यांच्यातील संबंध अवैध असल्याचे म्हटले. ही बातमी गावात व नातेवाईकांपर्यंत पोहोचली तेव्हा वहिनी आणि भावाचे लग्न ठरले.

उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. एका गर्भवती महिलेने तिच्या दिरासोबत लग्न केले आहे. यावेळी महिलेचा नवराही लग्नाला पाहुणा म्हणून उपस्थित होता. या प्रकरणी वहिण्ीचे आपल्या दिरासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बायको गर्भवती झाल्यानंतर ही बाब पतीला समजल्यावर त्याने पत्नीला सोबत ठेवण्यास स्पष्ट नकार दिला.

जौनपूरच्या बीबीपूर गावातील रहिवासी शिरोमणी गौतम यांचा मुलगा बहादूर गौतम याचा विवाह सरायखवाजा परिसरात राहणाऱ्या सीमा गौतमशी गेल्या वर्षी मे २०२३ मध्ये झाला होता. काही महिन्यांनी बहादूर गौतमने घरी माहिती दिली की, त्याची पत्नी सीमा हिचे लहान भाऊ सुंदर गौतमसोबत प्रेमसंबंध होते. घरात एकच गोंधळ उडाला. हळूहळू ही बातमी सर्वत्र पसरली.

यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या संमतीने सीमा आणि सुंदर गौतम यांनी कोर्टात लग्न केले. कोर्ट मॅरेजनंतर दोघांनी स्थानिक मंदिरात जाऊन सात फेरे मारले. बहादूर गौतमही सीमा आणि सुंदरच्या लग्नात सहभागी होण्यासाठी वर म्हणून मंदिरात पोहोचला. तेथे उपस्थित लोकांनी या नव-या जोडप्याला आशीर्वाद दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button