…अन् त्याने सेक्स वर्करचे हातोडीने तुकडे करून सुटकेसमध्ये भरले
चेन्नई: थोरापक्कम भागात सेक्स वर्करची हातोड्यानी हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरल्याची धक्कादायक घटना घडली. प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने पैशांच्या वादातून सेक्स वर्करची हत्या केल्याचे सांगितलं आहे.
थोरापक्कम पोलिसांना सूटकेसमध्ये महिलेचा तुकडे केलेला मृतदेह सापडला होता. यानंतर तपास सुरू झाला. प्राथमिक तपासात या महिलेची हत्या दुसऱ्या ठिकाणी करुन तिचा मृतदेह आयटी कॉरिडॉरजवळील रहिवासी भागात टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. याप्रकरणात पोलिसांनी मणिकंदन नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. तो शिवगंगई येथील रहिवासी असून त्यानेच ही हत्या केल्याचं उघड झालं आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मणिकंदनने चौकशीत पोलिसांना सांगितले की, पैशाच्या वादातून त्याने महिलेची हातोड्याने हत्या केली. त्याने हे देखील सांगितलं की त्याने, मृतदेहाचे तुकडे करुन ते सुटकेसमध्ये ठेवले होते.
ही महिला घरी न परतल्याने महिलेच्या भावाने तिला फोन केला. पण, तिचा फोन बंद येत होता. तेव्हा तिच्या भावाने ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्याने तिचे फोन लोकेशन ट्रॅक केले आणि तेव्हा कळाले की ती थोरापक्कमजवळ शेवटची दिसली होती.
त्यानंतर बुधवारी रात्री तिच्या भावाने पोलीस ठाण्यात जाऊन बहीण बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांना तिच्या शेवटच्या लोकेशनबाबतही सांगितले. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून आरोपी मणिकंदनचा माग काढला आणि त्याला अटक केली. त्याला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांच्या चौकशीत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानेच या महिलेला पैशांच्या वादावरुन हातोड्याने तिची हत्या केली. मग तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन बॅगेत भरले.