
बहिराईच : बहिराईच येथील एक मुस्लिम महिलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याचे कौतुक करणे चांगलेच महागात पडले आहे. महिलेच्या पतीने तिच्यावर गरम डाळ फेकत तिला तलाक दिला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी महिलेच्या पतीसह घरातील इतर सदस्यांना अटक केली आहे.
सदर महिलेचे नाव मरियम आहे. ती कुटूंबासोबत पहिल्यांदाच अयोध्या फिरायला गेले होते. यावेळी तिला शहरातील विकास पाहून छान वाटले. अयोध्येतील रस्ते आवडले. तसेच तेथील वातावरण, सुशोभीकरण देखील आवडलं. त्यामुळे तिने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे कौतुक केले. तिने मोदी आणि योगी यांचेचे केलेले कौतुक ऐकून तिचा नवरा चांगलाच संतापला. जेव्हा ते घरी आले त्यावेळी त्याने तिला चांगलीच मारहाण केली व अंगावर गरम डाळ फेकली. तसेच तिला घराबाहेर काढले. त्यानंतर त्याने तलाक दिला. तलाकचा निर्णय ऐकताच ती बेशुद्ध पडली.
शुद्धीत आल्यावर तिने स्थानिक पोलीस चौकीत गेले. पोलिसांनी या महिलेची तक्रार दाखल करत पतीसह कुटूंबातील सदस्यांना अटक केली आहे. सदर महिलेचे माहेर बहिराइच गावात असून तर सासर फैजाबादमध्ये झाले.