आसाराम बापू तुरुंगाबाहेर, या कारणामुळे मिळाला जामीन
गांधीनगर : अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आसाराम बापूला आज न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. 2013 मधील एका बलात्कार प्रकरणात गांधीनगर येथील स्थानिक न्यायालयाने आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अगदी तेव्हापासून आसाराम बापू तुरूंगात आहेत. मात्र आता वैद्यकीय कारणात्सव आसाराम बापूला 31 मार्चपर्यंत न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे.
आसाराम बापू 2013 सालच्या बलात्कार प्रकरणात गांधीनगरच्या कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. मात्र आता वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
अटींसह जामीन मंजूर
परंतु अंतरिम जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. न्यायालयाने आसाराम यांना वैद्यकीय आधारावर जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर करताना पुराव्यांशी छेडछाड करू नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले. याशिवाय जामीनादरम्यान कोणत्याही अनुयायांना भेटु नये, अशा कडक सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करताना सोबत पोलीस तैनात करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
आसारामच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात अनेकवेळा अर्ज दाखल केले आहेत. केवळ वैद्यकीय कारणांचा विचार करता येईल, असे न्यायालयाचे स्पष्ट म्हणणे आहे. तसेच त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची याचिका न्यायालयाने यापूर्वीच फेटाळली आहे. २०१३ मध्ये आश्रमात एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आसाराम यांना इंदूरमध्ये अटक करण्यात आली होती आणि २०१८ मध्ये त्यांना पोस्को न्यायालयाने दोषी ठरवले आहे.