महाराष्ट्रराजकारण

असली बारकी-चिरकी 5 उंदीरं पवार साहेब रोज नाश्त्याला खातात : जानकर

सोलापूर : जिल्ह्यातील माळशिरस येथील मारकडवाडी गावात महायुतीच्या नेत्यांची सभा पार पडली आहे. या सभेदरम्यान जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत जोरदार टीका केली आहे. मात्र आता माळशिरसचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

असली बारकी- चिरकी 5 उंदीरं पवार साहेब रोज नाश्त्याला खातात. त्याच्या मागे कोण सगळ्यांना माहिती आहे. अेशी बारीक उंदरे जाऊन तिथं पवारसाहेबांवर टीका करतात. बारक्या उंदरांच्या सुळसुळाटाने काय फरक पडत नाही.कावळ्याच्या शापाने गुर मरत नाहीत. पवार साहेब पवार साहेब आहेत. त्यांनी भल्याभल्यांना लोळवलं आहे. जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक होत नाही तोपर्यंत मारकडवाडीमधील आंदोलन सुरूच राहील, असं म्हणत उत्तमराव जानकर यांनी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले…
यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “ईव्हीएमला विरोधी करून बॅलेट पेपेरवर मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या आणि त्यासाठी आंदोलन करणाऱ्या शरद पवारांना आमचे आवाहन आहे की. शरद पवारांनी सर्वप्रथम आपल्या लेकीचा, आपल्या नातवाचा तसेच जयंत पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या तिघांचा पहिल्यांदा राजीनामा घेऊन त्यानंतर हे आंदोलन पुढे नेले पाहिजे.

तसेच काँग्रेसच्या राहुल गांधी आणि त्यांच्या बहीण प्रियंका गांधी यांनीही राजीनामा देऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. अन्यथा EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, असे म्हणत पडळकरांनी शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे.

शरद पवार यांचे सर्व राजकारण विश्वासघातावर अवलंबून होते. त्यांची अक्कल देखील या आंदोलनात संपल्याचे दिसते. 2017 ते 2024 पर्यंत एकानेही मशीनमध्ये कसा घोटाळा होतो ते दाखवू शकले नाहीत. जयंत पाटील यांनी हे सिद्ध केले तर लायकी नुसार 101 रुपयाचे बक्षीस आणि दुसऱ्या कोणीही हॅक करून दाखवल्यास 11 लाखाचे बक्षीस देऊ असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.

काय म्हणाले सदाभाऊ खोत
महाराष्ट्रातील धनगर समाज लोकशाही विरोधात आहे असे वातावरण तयार केले. 100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला आहे. या मतदारसंघात 100 गावं आहेत पण हेच गाव निवडले. कारण धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवाराने केले. बिनचिपळ्याचे नारदमुनी शरद पवारांनी आमच्या गावात येऊन आग लावण्याचा प्रयत्न केला, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. खळं लुटणारा गावाकडे आला. त्यामुळे तुम्ही त्याला बरोबर गावाकडं आणलं. तुमची पोरगी 1 लाखाने निवडून आली. नातू रोहित पवार निवडून आले तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली होती का? अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी पवारांवर टीका केली आहे.

राम सातपुते नेमके काय म्हणाले?
“अकलूज नगर परिषदेचा नगराध्यक्ष भाजपचा असेल, शेतकऱ्यांना लुटणारा शंकर सहकारी साखर कारखान्यावर येत्या ६-७ महिन्यात प्रशासक बसवल्याशिवाय राहणार नाही. यशवंत सहकारी साखर कारखान्यावर देखील चौकशी लावू. माळशिरस तालुक्याची जी लूटमार केली. माळशिरस तालुक्यातल्या गोर गरीब, सामान्य शेतकऱ्यांचे आणि वंचित घटकांचे पैसे ज्या सुमित्रा बँकेत ठेवले. ती बँक मोहिते पाटलांनी लुटली.

या स्टेजवरून मी मारुतीच्या साक्षीने सांगतो की, ज्या जयसिंह मोहिते पाटलांनी सुमित्रा बँक बुडवून खाल्ली, त्याला वर्षाच्या तुरुंगात नाही टाकलं, तर नावाचा राम सातपुते नाही. ज्या मोहिते पाटलांनी विजय मल्टीस्टेट बँक बुडवून खाल्ली, त्या मोहिते पाटलांना तुरुंगात टाकलं नाही, तर राम सातपुते नाव लावणार नाही.” असे राम सातपुते म्हणाले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button