क्राइममहाराष्ट्र

गंधोरा शिवारात शेतीच्या वादातून मारहाण;15 जणांवर गुन्हे दाखल

धाराशिव (प्रतिनिधी) – तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील गंधोरा शिवारात शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत सलगरा-गंधोरा या दोन्ही गावातील मिळून एकूण 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी गंधोरा येथील फिर्यादी-सविता राठोड,(वय 38 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नामे – बाळु नागनाथ पाटील,सतिश शहाजी पाटील, दयानंद सतिश पाटील,नवनाथ शहाजी पाटील,लक्ष्मण नवनाथ पाटील, नागनाथ शहाजी पाटील, संतोष धनाजी मुसळे, हणुमंत जाधव, प्रविण पदम भोसले, कल्याण हनुमंत जाधव, ज्ञानु हनुमंत जाधव, सर्व रा.गंधोरा ता.तुळजापूर, सागर मनिष मुळे,बाळु नामदेव मुळे, अमर अनिल मुळे, सर्व रा.सलगरा (दि.) ता.तुळजापूर, यांनी (दि.18ऑक्टोबर) रोजी 12.30 वा.सु.गंधोरा येथे फिर्यादी नामे-सविता नामदेव राठोड, (वय 38 वर्षे) रा.गंधोरा, यांना व त्यांचे आई, वडील, भाऊ व भावजय यांना आरोपींनी शेतीच्या वादाच्या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, काठी व कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सविता राठोड यांनी (दि.18ऑक्टोबर) रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम 118(1),74, 115(2),352, 351(2),189(2), 191(2), 191(3), 190, 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button