प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीविषयी सुजातकडून मोठे अपडेट

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्य तोंडावर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतू आता सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट देत निवडणूक कार्य सुरु ठेवण्यास सांगितले आहे.
सुजात आंबेडकर म्हणाले, “बाळासाहेबांची प्रकृती ठीक आहे आणि त्यांच्या तब्येतीची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. मी मीडिया आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की, हॉस्पिटलला त्रास होईल असे कोणतेही वर्तन करू नये. कृपया आपल्या-आपल्या मतदारसंघात थांबा आणि प्रचाराचे काम सुरू ठेवा.”
सुजात यांनी हे देखील सांगितले की, बाळासाहेबांवर उद्या अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे, अँजिओग्राफीदरम्यान हृदयात ब्लॉकेज असल्याचे आढळले आहे, त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात येईल.
प्रकाश आंबेडकर यांना गुरुवारी पहाटे छातीत वेदना जाणवू लागल्याने पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरूनही बाळासाहेबांच्या प्रकृतीसंबंधी माहिती देण्यात आली आहे. ताज्या माहितीनुसार, सध्या त्यांची तब्येत स्थिर आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार केले जाणार आहेत.
सुजात आंबेडकर यांनी असेही स्पष्ट केले आहे की, डॉक्टरांच्या अहवालानंतर पुढील माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात येईल. “आम्ही सर्व बाळासाहेबांच्या सोबत आहोत, आणि कार्यकर्त्यांनीही मतदारसंघात कामावर लक्ष केंद्रित करावे,” असे सुजात यांनी सांगितले आहे. |