आपल्यापेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या प्रियकरासोबत पळाली भाजप नेत्याची पत्नी
लखनौ : भाजप नेत्याची पत्नी अन् भाजपची सदस्या असलेली महिला आपल्या पेक्षा १५ वर्षानी लहान असलेल्या प्रियकरासह पळून गेली. महिलेसे तीन मुले असून पळून जाताना तिने एका मुलासह सोबत अडीच कोटी रुपयांचे दागिने आणि चार लाख रुपयांची रोकडही सोबत नेल्याचा आरोप आहे. सदर महिलेने भाजपच्या स्थानिक अध्यक्षपदाची निवडणूक लढलेली आहे.
४५ वर्षीय महिला तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या प्रियकरासह पळून गेली. सोबत तिने एका मुलाला नेलं, तर दोन मुलांना मागे सोडल्याची माहिती आहे. तीस वर्षीय हवालदार हा भाजप नेत्याच्या घरातच भाडेकरु म्हणून राहत होता.
गोपीगंज नगर येथील भाजप नेत्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, साधारण एक वर्षापूर्वी गोंडा येथील विनय तिवारी (उर्फ राज तिवारी) या हवालदाराने त्यांच्या घरात एक खोली भाड्याने घेतली होती. त्याच्या नकळत हवालदार आणि त्याच्या पत्नीचे प्रेम प्रकरण सुरू झाले.
पतीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्याच्यासमोर दोघांमधील प्रेम संबंध उघड झाले, तेव्हा त्याने तरुणाला ताबडतोब घर सोडण्यास सांगितले. “मी माझ्या पत्नीची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला, परंतु त्याचा फायदा झाला नाही. कॉन्स्टेबलला हाकलून दिल्यावर, त्याने आमच्यावर सूड उगवत कट रचला. त्याने माझ्या पत्नीला त्याच्यासोबत पळून जाण्यास भाग पाडले. तिने दोन कोटी रुपये किमतीचे दागिने, चार लाख रुपयांची रोख रक्कम आणि आमच्या सात वर्षांच्या मुलाला सोबत घेतलं, असंही पतीचं म्हणणं आहे.
दोघांचा शोध घेण्याचे प्रयत्न करूनही पत्नी आणि हवालदाराचा ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेत काही स्थानिक लोकांचा हात असावा असा आरोपही त्यांनी केला. त्याला घराबाहेर काढण्यापूर्वी अनेक वेळा अनुचित वर्तन करताना पकडलं होता आणि ही बाब स्थानिक पोलिसांना कळवण्यात आली होती, असं पतीने सांगितलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिला आणि हवालदाराचा शोध सुरू केला आहे.