देश-विदेश

प्रियकरासोबत पळालेल्या भाजप नेत्याच्या पत्नी मिडीयासमोर, पतीवर केले गंभीर आरोप

लखनौ : आपल्यापेक्षा १५ वर्षानी लहान असलेल्या हवालदार प्रियकरासह भाजप नेत्याची पत्नी पळून गेली होती. सोबत तिने कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेतल्याच्या आरोपांनी एकच खळबळ माजली होती. त्यानंतर आरोप झालेली भाजप नेत्याची पत्नी सरिता गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधत प्रतिक्रिया दिली आहे. आपण १५ वर्षांनी तरुण प्रियकरासोबत वगैरे काहीही पळून गेलेलो नसून, पतीच्या छळाला कंटाळून माहेरी गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. पत्नी प्रियकरासह पळून गेल्याची तक्रार भाजप नेते गगनकुमार गुप्ता यांनी उत्तर प्रदेशातील भदोही येथील गोपीगंज पोलीस ठाण्यात केली होती.

सरिता गुप्ता यांचा दावा काय?
मी पळून गेले नाही, तर पतीकडून होणाऱ्या छळामुळे सुरक्षित ठिकाणी लपली आहे, असा दावा सरिता गुप्ता यांनी केला आहे. या संदर्भात भदोहीचे एसपी, गोपीगंज पोलिस स्टेशनचे प्रमुख, एडीजी वाराणसी आणि पोलिस आयुक्त वाराणसी यांच्याकडे आधीच तक्रार केल्याचंही सरिता गुप्ता यांनी सांगितलं.

पतीचे आरोप काय?
माझी ४५ वर्षीय पत्नी तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या प्रियकरासह पळून गेली. सोबत तिने आमच्या सात वर्षीय मुलाला नेलं, तर दोन मुलांना मागे सोडल्याचं पतीने सांगितलं होतं. ३० वर्षीय हवालदार हा आमच्या घरातच भाडेकरु म्हणून राहत असल्याचं पतीने सांगितलं होतं. अडीच कोटींचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पत्नी हवालदारासह घरातून पसार झाल्याचा दावा पतीने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत केला होता. हवालदाराने पैशांसाठी आपल्या पत्नीला फूस लावल्याचा आरोपही त्याने केला होता.

कौटुंबिक वाद
सरिता गुप्ता यांच्या सांगण्यानुसार, २८ एप्रिल १९९८ रोजी त्यांचं लग्न गगन कुमार गुप्ता यांच्यासोबत झालं होतं. त्यांना तीन मुलं आहेत. मात्र लग्नानंतर पतीकडून सतत मानसिक आणि शारीरिक छळ त्यांना सहन करावा लागत होता. पतीने गेल्या पाच वर्षांपासून आपल्यावर अत्याचार करत आपल्याला मोलकरणीप्रमाणे वागवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

संपत्तीवरुनही विवाद
पतीने संपत्ती ताब्यात घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही सरिता गुप्तांनी केला आहे. २८ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांनी गोपीगंज पोलिस स्टेशनमध्ये पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आणि त्यानंतर त्या वाराणसी येथील आपल्या माहेरी परतल्या.

न्यायालयात याचिका
सरिता गुप्तांनी सांगितलं की, पतीकडून धमक्या आल्यानंतर त्यांनी कोर्टात कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. आता त्यांना स्वतःच्या आणि मुलांच्या भविष्यासाठी न्याय मिळावा अशी आशा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button