क्राइमक्राइम स्टोरीभारत

भाजप आमदाराने 20 वर्षीय मुलीकडे मागितले नग्न फोटो

हिमाचल प्रदेशचे भाजप उपाध्यक्ष आमदार हंस राज यांच्यावर FIR

देशभरामध्ये महिला अत्याचाराचे घटना थांबण्याचे नावच घेत नाही. कोलकाता प्रकरण देशात गाजत आहे. तर इकडे महाराष्ट्रातील बदलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर या शहरातसुध्दा महिला, मुली, चिमुरडी बालके अत्याचाराला बळी पडत आहे.

या घटनांची चर्चा असतानाच दुसरीकडे हिमाचल प्रदेशमधील पोलिसांनी भारतीय जनता पार्टीचे राज्यातील आमदार हसन राज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेला अश्लील मेसेज पाठवणे, तिच्याकडे नग्न फोटोंची मागणी करणे, तिला धमकावणे यासारख्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

चंबा जिल्ह्यातील चुराह येथून तीन वेळा आमदार राहिलेल्या हंस राज यांच्याविरुद्ध २० वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही तरुणी भाजपा कार्यकर्त्याची मुलगी असल्याचं सांगितलं जात आहे. हंस राज हे आमदार असण्याबरोबरच हिमाचल प्रदेशमधील भाजपाचे उपाध्यक्ष आहेत. चंबा येथील महिला पोलीस स्टेशनमध्ये ९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी नोंदवण्यात आलेल्या तक्रारीचा तपशील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरच यासंदर्भातील माहिती समोर आली.

सोशल मीडियावर या तक्रारीचा तपशील व्हायरल झाल्यानंतर संबंधित पीडित तरुणीने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना आपणच तक्रार नोंदवल्याचं सांगितलं. “आपण मानसिक तणावामध्ये आहोत,” असा दावा या तरुणीने केला आहे. कलम 164 सीआरपीसीअंतर्गत स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांसमोर या तरुणीने आपला जबाब नोंदवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. “तरुणीने नोंदवलेल्या जबाबामध्ये या प्रकरणात आपल्याला पुढे तपास व्हावा असं वाटत नाहीये, असं म्हटलं आहे. मात्र आम्ही तपास करत आहोत,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.

हंस राज यांनी आपल्याला अश्लील मेसेज पाठवले. तसेच आपल्याला एकट्यात भेट अशी मागणी भाजपा आमदाराने केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. आपल्याकडे या आमदाराने नग्न फोटोंची मागणी केल्याचा धक्कादायक दावा तरुणीने केला आहे. या तरुणीने तिचे वडील बूथ स्तरावरील भाजपा कार्यकर्ते असल्याचं नमूद केलं आहे. आपल्याकडे दोन मोबाईल होते. त्यापैकी एक मोबाईल या आमदाराने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी फोडल्याचा आरोपही तरुणीने केला आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी तरुणीने केली आहे. हा आमदार हे चॅट आणि मेसेज डिलीट करण्यासाठी आपल्यावर दबाव आणत असून आपल्या जीवाला धोका असल्याचं तरुणीने म्हटलं आहे.

माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते जय राम ठाकूर यांनी हे गंभीर आरोप आहेत, असं म्हटलं आहे. “मी सर्व गोष्टी तपासून पाहणार आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये ही एफआयआर नोंदवण्यात आली हे महत्त्वाचं आहे. मला हंस राज यांचा फोन आला होता. त्यांनी त्यांची बाजू मला सांगितली. मात्र या प्रकरणामध्ये सर्व बाजू तपासून पाहणे गरजेचे आहे,” असं जय राम ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button