मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी आली आहे. शाहरुखला धमकी मिळाल्यानंतर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायपूरवरून हा ही धमकी आल्याचं समोर आलं आहे. पोलिसांचं एक पथक पुढील तपासासाठी रायपूरला रवाना झाले आहे. यापुर्वी सलमान खान याला बिश्नाई गँगकडून धमकी आली आहे. त्यानंतर शाहरूख खान यास धमकी आल्याने बॉलीवुडमध्ये खळबळीचे वातावरण अाहे.
मुंबई पोलीस या प्रकरणाची गंभीर दखल घेत आहेत. शाहरुख खानची सुरक्षाही वाढवली जाण्याची शक्यता आहे. तसेच पोलिसांनी मन्नतच्या बाहेर बॅरिकेड्स लावले आहेत. शाहरुख खानला ही धमकी देण्यामागचा हेतू शोधला जात आहे. मुंबई पोलिसांचं एक पथक रायपूरला गेलं आहे. तेथे हे पथक या प्रकरणाची चौकशी करेल. वांद्रे पोलीस ठाण्यात धमकीचा फोन आला होता. यानंतर एकच खळबळ उडाली.
धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने म्हटलं की, शाहरुख खानचा जीव वाचवायचा असेल तर आम्हाला कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा परिणामांना सामोरं जावं लागेल. त्यानंतर कॉल डिस्कनेक्ट झाला. आरोपीने फोन बंद केला आहे. त्याचं नेमकं लोकेशन शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शाहरुखने काही दिवसांपूर्वी सलमान खानचीही भेट घेतली होती आणि दोन्ही स्टार्स एकमेकांच्या घराजवळच राहतात.