काेलकाता डाॅक्टर हत्या : आराेपीचे चार लग्न अन् पाॅर्नचे व्यसन

काेलकाता – काेलकाता डाॅक्टर अत्याचार आणि हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपीचे चार लग्न झाले आहे. तसेच त्याला पाॅर्नचे व्यसन हाेते. त्याच्या याच वाईट वागण्यामुळे तीन बायकांने त्याला साेडचिठ्ठी दिली. चाैथी पत्नीचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. 9 ऑगस्ट राेजी आरजी कार मेडिकल काॅलेजच्या महिला डाॅक्टरचा मृतदेह सेमिनार हाॅलमध्ये सापडला हाेता. याप्रकरणात पाेलिसांनी संजय राॅय याला अटक केली. पाेेलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे उघड झाली.
पाेलिसांच्या माहितीनुसार, संजय राॅय याला पाॅर्न पाहण्याचे व्यसन हाेते. 9 ऑगस्ट राेजी रात्री संजय राॅय हा दारू पिवून पाॅर्न व्हिडिओ पाहत हाेता. तेथून ताे रुग्णालयातील सेमिनार हाॅलमध्ये गेला. तिथे एकट्या झाेपलेल्या महिला डाॅक्टरचा त्याने खून गेला. महिलेचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचे समजते. तसेच पिडीताच्या डाेळे आणि ताेंडातून रक्तस्राव झाला हाेता.
ममता बॅनर्जी पिडीताच्या घरी
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पिडीताच्या कुटूंबांची भेट घेवून आराेपीला ाशीच्या शिक्षेचे आश्वासन दिले. याप्रकरणी पाेलिसांनी रविवारपर्यंत तपास पूर्ण करावा. अन्यथा ही केस सीबीआयकडे वर्ग करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी घाेषित केले.