देश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्र

कीपॅड न वापरता करा चॅटिंग; व्हॉट्सॲपचे नवीन फीचर

व्हॉट्सॲपने भारतात वॉइस मेसेजचे मजकूर करण्याची (Voice Note Transcription) सुविधा आणली आहे. या नवीन फीचरमुळे आता तुम्ही थर्ड-पार्टी ॲप्सचा वापर न करता थेट व्हॉट्सॲपवर तुमच्या आवाजात संदेशांचे मजकूर तयार करू शकता. हा आवाजाचा मजकूर तयार करणारा पर्याय हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे आता संदेशांचा अर्थ समजण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा आवाज ऐकावा लागणार नाही.

या फीचरचा वापर कसा करायचा?
व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमध्ये जा आणि “चॅट्स” (Chats) निवडा.

“व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्ट्स” (Voice Message Transcripts) पर्याय चालू करा.

आता एखादा आवाज संदेश आला की त्याच्या खाली “ट्रान्सक्राइब” (Transcribe) चा पर्याय दिसून येईल.

या पर्यायावर क्लिक केल्यावर व्हॉट्सॲप मजकूर फाईल डाउनलोड करेल आणि संदेशाखाली मजकूर दाखवेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button