छत्रपती संभाजीनगर ऑनर किलिंग : भावजीची हत्या करणारा ‘साला’ गजाआड
छत्रपती संभाजीनगर : मुलीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरा अन् चुलत साल्याने जावयाला भररस्त्यावर चाकूने भोसकले. पोट, मांडीत जीवघेणे वार केले. ही घटना १४ जुलैला रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास इंदिरानगर, गारखेडा भागात घडली होती. उपचारादरम्यान तरुणाचा गुरुवारी २५ जुलैला तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पसार झालेला आरोपी अप्पासाहेब अशोकराव कीर्तिशाही (रा. इंदिरानगर) याला परिमंडळ एकच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली. आरोपीला जवाहर नगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
फिर्यादी मुरलीधर साळुंखे हे पत्नी, दोन मुले आणि सुनेसह इंदिरानगर येथे राहतात. २ मे २०२४ रोजी त्यांचा मोठा मुलगा अमित यांनी गीताराम कीर्तिशाही यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता. हे लग्न पार पडल्यानंतर गीताराम कीर्तिशाही व मुलीचा चुलत भाऊ अप्पासाहेब कीर्तिशाही यांनी मुरलीधर यांची भेट घेऊन अमित आणि त्याच्या पत्नीला इंदिरानगरमध्ये राहू देऊ नका. जर ते येथे दिसले तर त्यांच्या जीवाचे बरेवाईट करू, अशी धमकी दिली होती. तेव्हापासून ते खुन्नस देत होते. दरम्यान, साळुंके कुटुंबीयांनी १४ जुलै रोजी रात्री १०.१५ वाजता जेवण केले. त्यानंतर अमित हा पायी फिरण्यासाठी घराबाहेर पडला. त्यानंतर १०.४५ वाजता कीर्तिशाही चुलता-पुतण्याने अमितला गाठले. आमच्या मुलीसोबत लग्न करून उलट येथेच आमच्यासमोरच राहतो का, असे धमकावून विचारत त्यांनी अमितवर चाकूहल्ला केला. त्याच्या पोटात, मांडीवर आणि हातावर चाकूने वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर ते पळून गेले. तेव्हा आरडाओरड ऐकून मुरलीधर आणि दुसरा मुलगा सुमित हे तिकडे धावले. यांनी अमितला उचलून घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे अमितने हल्लेखोर सासला आणि चुलत साल्याचे नाव सांगितले होते. उपचारादरम्यान अमितचा मृत्यु झाल्यानंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत आरोपीला टक करण्याची मागणी केली अनथ्या अंत्यविधी करणार नसल्याचे पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर अमितचा अंत्यविधी केला होता.
सापळा रचून अप्पासाहेबला ठोकल्या बेड्या
परिमंडळ १ चे उपायुक्त नितीन बगाटे यांना अप्पासाहेब कीर्तिशाही हा शहरालगत असलेल्या सावंगी- चौका भागात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. बगाटे यांनी त्यांच्या विशेष पथकातील पोलिस उपनिरीक्षक खटके, विशाल पाटील आणि सोनवणे याना तात्काळ सूचना देऊन सावंगी भागात पाठिवले. प[पथकाने अप्पासाहेब कीर्तिशाही याला सापळा रचून बेड्या ठोकल्या.