महाराष्ट्रराजकारण

आमदारकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीएचे बंड, लढणार अपक्ष

नांदेड : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष यांच्यात सध्या जागा वाटपावरून रणधुमाळी माजली आहे. यातच राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी स्वीय सचिव बालाजी पाटील खतगावकर यांची अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासगी स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए असलेले बालाजी खतगावकर मुखेड विधानसभेत ते आपलं नशीब आजमवण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून बालाजी खतगावकर मुखेड मतदार संघात प्रचार करत होते. शिवसेनेची उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र मुखेडची जागा भाजपाची असल्याने तिथे भाजपाने उमेदवार जाहीर केला. त्यामुळे बालाजी खतगावकर यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली.

बालाजी पाटील खतगावकर हे मागची 37 वर्षे प्रशासकीय सेवेत कार्यरत होते. गेल्या पंचवीस वर्षांपासून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अधिकारी म्हणून खतगावकर यांची ओळख होती. शासकीय सेवेतील निवृत्तीनंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी नांदेडच्या मुखेड – कंधारमधून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती.ं

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button