महाराष्ट्रराजकारण

मुख्यमंत्रीपद : फडणवीस यांचा पत्ता कट, खा.मोहोळ शर्यतीत?

मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस हे शर्यतीत असतानाच अचानक सोशल मिडीयावर दुसरेच नावाचा जोरात चर्चा आहे. भाजप सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात काही दिवसापूर्वी बैठक झाली. यात मराठा समीकरण लक्षात घेत त्यासंदर्भातील चाचपणी भाजप श्रेष्ठींकडून सुरु असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे फडणवीसांना मुख्यमंत्रीपद न देता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

कुस्तीचा आखाडा गाजवत असतानाच भाजपातून राजकारणात प्रवेश केलेले मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. पहिल्याच प्रयत्नात खासदारकी पटकवणाऱ्या मोहोळ यांच्या खांद्यावर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचीही धुरा देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मुरलीधर मोहोळ यांनी चार वेळा पुणे महापालिकेचे नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपदही भूषवले आहे. मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अमित शाह यांचे ते विश्वासू मानले जातात.

मुरलीधर मोहोळांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय, ज्यात त्यांनी म्हटलंय, “समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे.आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे.”

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button