मुख्यमंत्र्यांच्या गायब ‘समोसे’साठी लावली सीआयडी चौकशी
चंदीगड : राज्याचा कारभार असलेल्या मुख्यमंत्र्यंचा थाट हा वेगळाच असतो. आतापर्यंत मंत्र्यांच्या हरवलेल्या कुत्र्यासाठी सर्व पोलिस यंत्रणा कामाला लावल्याची घटना घडली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या गायब ‘समोसे’साठी लावली सीआयडी चौकशी घटना घडली आहे. मुख्यमंत्र्यांसाठी फाईव्ह स्टार हॉटेलमधून मागवलेले समोसे त्यांच्याच सुरक्षा रक्षकांना वाटले गेले अन् नाराज झालेल्या मुख्यमंत्र्यांनी याची सीआयडी चौकशी लावली.
ही घटना आहे हिमाचल प्रदेशातील. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू सध्या समोसे गायब झाल्याने चर्चेत आले आहेत. साध्या समोस्यासाठी सीआयडी चौकशीला लावल्याने त्यांच्यावर विरोधक टीका करत आहेत. या समोस्याची किंमत किती? खास मुख्यमंत्र्यांनी ते समोसे रेडिसन ब्ल्यू या फाईव्ह स्टार हॉटेलमधून मागविले होते. ते चुकून त्यांच्याच सुरक्षा रक्षकांमध्ये वाटले गेले आणि साहेबांचा हिरमोड झाला व पुढील सगळा खेळ सुरु झाला.
तसेतर हा प्रकार २१ ऑक्टोबरचा आहे. सीएम सुक्खू हे सीआयडीच्या मुख्यालयाच्या दौऱ्यावर होते. त्यांच्यासाठी लक्कड बाजारच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमधून समोसे आणि नाश्ता असे तीन डबे मागविण्यात आले होते. परंतू, समोसे काही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत. मध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनी साधे समोसे समजून ते त्यांच्या सुरक्षा रक्षकांना वाटून टाकले. हा प्रकार सीआय़डी मुख्यालयातच घडल्याने सीआयडी चौकशीला लागली. आता विरोधकांनी यावरून खिल्ली उडवायला सुरुवात केल्यावर सुक्खू यांनी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर सीआयडी सहभागी झाल्याचे म्हणत तुम्ही मीडियानेच समोसा बातम्या उठविल्याचे म्हटले आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एसआयला मुख्यमंत्र्यांसाठी नाश्ता आणण्याचे आदेश दिले होते. त्याने ते काम नेहमीप्रमाणे एएसआयकडे सोपविले, त्याने सोबतीला एका हेड क़ॉन्स्टेबलला सोबत घेतले आणि त्यांनी हॉ़टेलमधून पॅकबंद डब्यातून नाश्ता आणला. नाश्त्याची व्यवस्था पर्यटन विभागाचा अधिकारी सांभाळत होता. त्याला समोसे मुख्यमंत्र्यांसाठी मागविले याचा अंदाज नव्हता. यामुळे त्याने ते सर्व समोसे मुख्यमंत्र्यांकडे न नेता मॅकॅनिकल ट्रान्सपोर्ट सेक्शनला थांबलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना देऊन टाकले.
समोसा अजून कसा आला नाही याच्या काळजीत सीआयडी आणि वरिष्ट अधिकारी पडले. त्यांनी याची चौकशी सुरु केली, तेव्हा यात सहभागी लोकांचे वागणे सीआयडी विरोधी आणि सरकार विरोधी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यावरून विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात करताच सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तो नाश्ता मुख्यमंत्र्यांसाठी होता हे फक्त त्या उप निरिक्षकालाच माहिती होते, अशी सारवासारव केली.