महाराष्ट्रराजकारण

एक मिनिटाची किंमत… उमेदवार नाही भरु शकला अर्ज…

नागपूर : एक जुनी म्हण आहे, वेळ बलवान आहे. वेळ किती बलवान आहे? एक-एक मिनिटाची किंमत काय? हे तेव्हाच कळतं, जेव्हा एखादा माणूस काही क्षण, सेकंद आणि काही मिनिटांमुळे आपल्या लक्ष्यापासून चुकतो. ताजी घटना महाराष्ट्र निवडणुकीशी संबंधित आहे. एका मिनिटाची किंमत काय असते, हे कोणी नागपूरच्या अनिस अहमद यांना विचारा. मध्य नागपूरच्या विधानसभा जागेवरुन प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन अघाडीने अनिस यांना उमेदवारी दिली होती. पण एक मिनिट उशिर झाल्यामुळे ते उमेदवारी अर्ज दाखल करु शकले नाहीत. माजी आमदार आणि माजी मंत्री अनिस अहमद हे काँग्रेसकडून तिकीटासाठी दावेदार होते. काँग्रेसकडून तिकीट मिळालं नाही, तेव्हा अनिस यांनी हाताची साथ सोडून वंचिकडून तिकीट मिळवलं.

एका मिनिटाची काय किंमत मोजावी लागते याची प्रचिती राजकारण्यांना आली आहे. माजी मंत्री राहिलेले, तीनवेळा आमदारकी भुषविलेले माजी आमदार अनीस अहमद यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. महाराष्ट्रात अर्ज भरण्यासाठीची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर होती. दुपारी ३ वाजेपर्यंतच अर्ज घेतले जाणार होते. परंतू अहमद हे तीन वाजल्यानंतर एक मिनिटाने नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. अधिकाऱ्यांनी तीन वाजताच गेट बंद केल्याने अहमद हे उमेदवारी अर्ज दाखल करू शकले नाहीत. अहमद यांनी जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

अनीस अहमद हे नागपूर मध्य मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत. काँग्रेसमधून तिकीट मिळत नसल्याचे पाहून त्यांनी मुंबई गाठत प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता. वंचितची उमेदवारी त्यांना जाहीर झाली होती.

अहमद यांनी केलेल्या दाव्यानुसार ते वेळ संपण्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोहोचले होते. तिथे सुरक्षा यंत्रणेने त्यांना सुरक्षा तपासणीमध्ये विलंब केला. आपल्य़ाला आणि आपल्या सहकाऱ्यांना सुरक्षा रक्षकांनी रोखले होते. तिथे बेंचवरून वाद झाला आणि काही मिनिटे उशीर झाल्याने मला उमेदवारी अर्ज भरता आला नाही, असा दावा अहमद यांनी केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button