क्राइम स्टोरी

CRIME STORY : बहिरुने जीवनभर सोसला सावत्रपणाचा जाच पत्नी सारिकासह त्याच्या जीवाला लागली खाच

अहमदनगर : नवरा-बायकोत वाद पेटला आणि ते विभक्त झाले तर मुलांच्या भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. आई-बाप दोघेही तरुण असतात, त्यांना जन्माचे जोडीदार हवे असतात, त्यामुळे ते दुसरा जोडीदार शोधून संसार पुन्हा मांडतात. पहिल्या संसारात जन्मलेले चिमुकले जीव मात्र आई-बाप असूनही पोरके होतात. सावत्र आई किंवा बाप बहुतेकदा मुलांना लळा लावत नाही. पोटच्या पोराचा राग करणाऱ्या माणसांना सावत्र मुलाची माया कोठून येणार? सावत्र आईकडून आणि तिचे ऐकून बापाकडून होणारा छळ सोसत आयुष्यभर अश्रू गाळणाऱ्यांच्या नशिबी काही वेळा दुर्दैवी मरण येते. अहमदनगर जिल्ह्यातील एका तरूणाच्या आयुष्याची व्यथा तशीच होती. आई-बाप वेगळे झाले आणि सज्ञान होईपर्यंत त्याचा सांभाळ मामा व आजोबांनी केला. सज्ञान झाल्यानंतर शेतीकामाला फुकट मजूर मिळेल म्हणून बापाने त्याला घरी आणला. सावत्र आई मरेपर्यंत काम करून घ्यायची, पण पोटाला देत नव्हती. त्यातच त्याचे लग्न झाले. शेतात कामाला आता दोन माणसे झाली होती. गुरासारखे काम करायचे, नंतर छळ सोसायचा असे त्या नवदाम्पत्याचे झाले होते. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यात दोघांचे मृतदेह विहीरीत सापडले. त्यांच्या आयुष्याची अखेर झाली, पण त्यांचे आयुष्य संपवण्यास त्याचे वडील व सावत्र आईच जबाबदार असल्याचा आरोप होत असून समाजातून संताप व्यक्त होत आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील खिरविरे येथील दोन महिन्यापूर्वी लम झालेले बहिरू काळी डगळे (वय २५) व त्याची पत्नी सारिका (वय २२) यांचे मृतदेह घराजवळच्या विहीरीत दि. ४ जुलै २०२४ रोजी संशयास्पदरित्या आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. हा अपघात की घातपात याविषयी सर्वत्र चर्चा सुरू झाली. दोनच महिन्यापूर्वी एकमेकांच्या पसंतीने विवाहबद्ध झालेल्या या दाम्पत्याचे मृतदेह हात बांधलेल्या तसेच दोघांची शरीरे ओढणीने बांधलेल्या अवस्थेत स्वतःच्या शेतातील विहीरीत आढळून आली होती. या घटनेसंदर्भात बहिरू डगळेचे मामा (आजोळकडील मंडळी) तसेच सारिका डगळेच्या माहेरकडील मंडळींनी जोरदार आवाज उठवला गावकऱ्यांनी त्यांना साथ दिल्याने अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी मयत बहिरू डगळेचे मामा एकनाथ रामभाऊ कुलाळ यांच्या फिर्यादीवरून बहिरूचे वडील काळू डगळे, सावत्र आई हिराबाई काळू डगळे, चुलता संतोष काशीनाथ डेगळे, आजोबा काशीनाथ लक्ष्मण डगळे या सर्वाविरुद्ध गुन्हा गुन्हा रजि. नं. ४१२/२०२४ भा.दं. वि. ३०२ च इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलिसांनी बहिरू डगळे च सारिका डगळे यांचे मृतदेह विहीरीतून बाहेर काढून मृतदेह तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला. पंचनामा केल्यानंतर दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

बहिरू डगळेचे मामा एकनाथ रामभाऊ कुलाळ (वय २९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बहिरुच्या जीवनाची शोकांतिका विषद केली आहे. अकोले तालुक्यातील पाडोशी या गावात रहाणाच्या रामभाऊ कुलाळ व लिलाभाई कुलाळ यांच्या कुटुंबात मुलगा एकनाथ, सून लिला व नातवंडे असा सर्वसामान्य परिवार. एकनाथ हा फिटरचे काम करतो. केळी रुम्हणवाडी येथे त्याचे मोटार सायकलचे गॅरेज आहे. एकनाथ लहान असतांना त्याची मोठी बहीण रंभाबाई हिचे लग्न अकोले तालुक्यातील खिरविरे येथील काळू काशिनाथ डगळे याच्याशी झाले होते. सुरुवातीचे काही दिवस त्यांचा संसार व्यवस्थित चालला. रंभाबाईला काळूपासून एक मुलगा झाला. त्याचे नाव बहिरु.

रंभाबाई-काळू यांच्यात वारंवार भांडण-तंटे होत असल्याने वरचेवर होणा-या या कटकटीला कंटाळून मध्यस्थामार्फत त्यांच्यामध्ये घटस्फोट झाला. त्यावेळी कोर्टाने बहिरू सज्ञान होईपर्यंत त्याची जबाबदारी आईचे वडील रामभाऊ संतू कुलाळ यांच्यावर सोपवली होती. कोटनि केलेल्या आदेशानुसार बहिरु आजोळी कुलाळ कुटुंबीयांकडेच रहात होता.
दरम्यान कुलाळ कुटुंबीयांनी रंभाबाईचे लग्न दुसरीकडे लावून दिले होते. बहिरुने इयत्ता दहावीपर्यंत पाडोशी येथे शिक्षण घेतले. दरम्यान त्याचे वडील काळू काशीनाथ डगळे यांनी त्याला खिरविरे येथे रहाण्यास बोलावल्याने तो काही दिवस सुट्या असतांना खिरविरेला रहायला जात होता. त्याच्या आईचा घटस्फोट झाल्यानंतर वडीलांनी हिराबाई हिच्याशी लग्न केले होते. बहिरू आता मोठा झाला. हाताशी आला. तो शेतातील कामे करेल या उद्देशाने त्याचे वडील काळू डगळे त्याला घरी बोलवायचे, मात्र त्याची सावत्र आई त्याला ‘इथे फुकट खायला आला का? तुझा इथं काय संबंध आहे? इथे तुझ्या बापाने कमावून ठेवले आहे का?’ असे त्याला वाईट-साईट बोलायची. तसेच त्याचे वडील काळू यांना म्हणायची ‘याला इथून काढून द्या’ असे सतत घालून-पाडून बोलत असल्याने बहिरूला तेथे रहावेसे वाटत नव्हते. तो आजोळी पाडोशीलाच रहायचा. त्यानंतर बहिरू खिरविरेला फारसा गेला नाही. त्याने पाडोशीला राहूनच शेंडी येथे त्याचे शिक्षण पूर्ण केले.

सुमारे दीड वर्षापूर्वी बहिरु डगळे याचा मामा एकनाथ कुलाळ याने केळी रूम्हणवाडी येथे मोटरसायकलचे गॅरेज सुरू केले होते. तेव्हापासून बहिरु त्याच्याकडेच काम करत होता. त्याचदरम्यान पाड़ोशी गावातील रामू त्रिंबक साबळे यांची मुलगी सारिका हिच्याशी बहिरूचे प्रेमसंबंध जुळून आले होते. साबळे कुटुंब व कुलाळ कुटुंब यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध असल्याने त्यांचे लग्र जमले होते. बहिरूचे लग्न जमल्याची कुणकुण खिरबिरे येथील त्याचे वडील काळू डगळे व सावत्र आई हिराबाई यांना लागली. जसजसे लग जवळ येवू लागले, तसे बहिरूचे वडील त्याला खिरविरेला ये असे म्हणायला लागले. त्याला म्हणाले, ‘तुझे लग्य आम्ही करतो. तू इथेच रहा. त्यामुळे बहिरू काही दिवस खिरविरेला तर काही दिवस पाडोशीला रहायचा.

बहिरू व सारिकाचे लग्र दि. २८ एप्रिल २०२४ रोजी पाडोशी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. लग्र झाल्यावर बहिरू, त्याची पत्नी – सारिकाला घेवून त्याच्या घरी खिरबिरे येथे गेला. त्याच्या घरात बडील काळू डगळे, सावत्र आई हिराबाई, त्याचे आजी-आजोबा रहात असत. लग्नानंतरच कधी- – कधी बहिरू केळी रूम्हणवाडी – येथे मामा एकनाथ कुलाळकडे जावून बसायचा. त्यावेळी तो नेहमी सांगायचा, ‘माझे आई- वडील मला व सारिकाला खूप त्रास देतात. थोडा वेळ जरी आम्ही बसलो तर आम्हाला शिवीगाळ करतात. घालून-पाडून बोलतात. आम्हाला रहाण्यासाठी त्यांनी गोठ्यात जागा दिली आहे. मी आणि सारिका गोठ्यातच झोपतो. तसेच आम्हाला दोघांना शेतात कामाला लावायचे. काम नाही केले तर तर आम्हाला आरडाओरडा करून काम सांगायचे. जेवायला द्यायचे नाही.’ अशी सगळी कर्मकहाणी बहिरू सांगायचा.

बहिरू सतत तणावात असायचा. त्याचे गॅरेजच्या कामांत मन लागायचे नाही. त्यावेळी एकनाथ मामा त्याला समजून सांगायचा. पाडोशीला आपल्याकडे रहायला ये म्हणायचा. त्यावेळी बहिरू म्हणायचा, आमचे घर खिरविरेला आहे, आज ना उद्या – आई-वडील आमच्याशी चांगले वागतील. या आशेवर बहिरू व त्याची पत्नी सारिका जगत होते. त्याच्या आई-बापाला हे दोघे शेती कामासाठी पाहिजे होते, त्यामुळे ते त्यांना पाडोशीला पाठवत नसल्यामुळे बहिरू चोरून लपून पाडोशीला येत होता.

बहिरूचा मामा एकनाथ कुलाळ याचे केळी रूम्हणवाडी येथे महादेव तिर्थक्षेत्रावर दि. ३० जून २०२४ रोजी लग्न होते. मामाने त्याला आठ दिवस अगोदर निमंत्रण देवून लग्नाला लवकर बोलावले होते, पण शेतात नागलीची लावणी असल्याने जाता येणार नाही असे वडीलांनी त्याला सांगितले होते. मामाचे लग्न असूनही भाचा बहिरूला त्याचे आई-वडील लग्नाला पाठवत नसल्याने मामा एकनाथ कुलाळ व त्याचा मित्र सौरभ गाडे हे दोघे जण खिरविरेला काळू डगळे यांना निमंत्रण देण्यासाठी समक्ष गेले होते. त्यावेळीही त्यांनी नागलीची लावणी असल्याने त्यांना लग्नाला पाठवता येणार नाही असे उद्दामपणे सांगितल्यामुळे बहिरूचा मामा एकनाथ तसाच तिथून केळी रूम्हणवाडीला निघून आला.

लग्नाच्या दिवशी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मामाच्या लग्नाला बहिरू आणि त्याबी पत्नी वि असे दोघे आले. त्यावेळी बहिरू द याने सांगितले की, आम्ही दोघे अ जण लप्रासाठी पळून आलो आहे. त त्यावेळी गडचडीत असतांनाही वि एकनाथने त्यांना धीर दिला. श लग्नानंतर बघू असे तो म्हणाला, पण त्याचे स्वतःचेच लम असल्याने तो फारसे लक्ष देवू शकला नाही, मात्र लगामध्ये बहिरूने आई रंधाबाई, आजी लिलाबाई, आजोबा रामभाऊ, प्रदीप दिघे, अक्षय तळपे, सागर गवांदे, विजय तळपाडे या सगळ्यांना सांगितले की, मला व माझ्या बायकोला आई-वडील खूप त्रास देतात. लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शेतात काम करायला लावतात. ‘तुम्ही येथे राहू नका. तुम्हाला आमच्या जमिनीतील हिस्सा – देणार नाही, तुम्ही इथून निघून जा’ असे म्हणतात. तुम्ही दोघे माझ्या नजरेसमोर येवू नका. तुम्हाला माझ्या इस्टेटीमधून काही देणार नाही. तू तुझ्या मामाकडून – जमिनीचा हिस्सा घे असे म्हणतात.

बहिरू व सारिका हे दोघे जण आजी-आजोबांच्या गळ्यात पडून रडले, तेंव्हा ते म्हणाले आम्हाला तेथे जायचे नाही. त्यावेळी आजोबांनी त्या दोघांची समजूत काढून दोन दिवसांनी बैठक घेवून त्यांना समजावून सांगू असे सांगितले. ते शांत झाले आणि घरी खिरबिरे येथे दुःखद अंतः करणाने निघून गेले. खिरविरे येथे पोहोचल्यावर बहिरूने आजोबा रामभाऊ आणि मावस बहीण पल्लवी प्रकाश भवारी यांना घरी पोहोचल्याचे सांगितले.

दुसऱ्या दिवशी दि. १ जुलै २०२४ रोजी सकाळी ८ वाजता सारिकाच्या भावाची बायको घरी आली. तिने सांगितले की, बहिरू व सारिका त्यांच्या घरी नाहीत. ही माहिती मिळाल्यावर एकनाथ कुलाळ (बहिरूचे मामा) आणि त्यांचे काही मित्र व नातेवाईक त्यांचा शोध घेण्यासाठी खिरविरेला गेले. काळू डगळेच्या वस्तीवर पोहोचल्यावर त्यांनी बहिरू आणि सारिका कुठं आहेत यांची चौकशी केली. त्यावेळी काळू आणि हिराबाईने उडवाउडवीची उत्तरे दिली. सावत्र भाऊ संकेत याने बहिरू आणि सारिका यांची गोठ्याजवळील झोपायची जागा दाखवली असता त्याठिकाणी अंथरूण अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यांच्या चप्पला तेथेच होत्या. त्या रात्री पाऊस चालू होता तरी त्यांचे जर्किन त्याच ठिकाणी होते, दोघांचा बराच शोध घेतला, पण ते मिळून आले नाहीत. म्हणून पुन्हा काळू व हिराबाईला विचारले, तेंव्हा त्यांनी आमच्या दारात कशाला आला आहात? आमची मुले आहेत. मेले गेले तर आम्ही बघून घेवू अशी उत्तरे दिली. त्यानंतर सर्वांनी खिरविरे, शेणीत, देवगाव परिसरात त्यांचा शोध घेतला, पण ते मिळून आले नसल्यामुळे सारिकाचे वडील रामू त्रिंबक साबळे यांनी अकोले पोलीस स्टेशनमध्ये मिसींग दाखल केली.

बहिरू आणि सारिका यांचा शोध सुरूच होता. नातेवाईकांचा संशय काळू व हिराबाईवर होता. दि. ४ जुलै २०२४ रोजी दोघांचा शोध घेत असतांनाच दुपारी समजले की डगळे याच्या घराशेजारील विहीरीत दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगत आहेत. सर्व नातेवाईक व ग्रामस्थ विहीरीजवळ गेले. त्यांनी खात्री केली आणि अकोले पोलिसांना खबर दिली. पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील काही वेळातच घटनास्थळी पथकासह पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांच्या सहकायनि मृतदेह विहीरीबाहेर काढून सरकारी कारवाई केली. खिरविरे गावातील वातावरण गंभीर बनले होते. लोकांचा संताप अनावर झाल्यामुळे पोलीस निरीक्षक पाटील यांनी त्यांना शांततेचे आवाहन केले. पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले. त्यानंतर निष्पाप बहिरू व सारिकाचा अचानक मृत्यू झाल्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डगळे यांचे घर आणि ट्रॅक्टर पेटवून दिले.

पोस्टमार्टमनंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दि. ५ जुलै २०२४ नातेवाईकांनी डगळे यांच्या घरासमोरच अंत्यविधी करण्याचे ठरवले, मात्र पोलीस प्रशासन, व समंजस नागरिकांनी मध्यस्थी केल्याने तो निर्णय मागे घेवून इतरत्र अंत्यविधी करण्यात आला. दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेले निष्पाप दाम्पत्य बहिरू व सारिका आपल्या पालकांना जगण्याचा हक्क मागत होते, “मात्र तोही त्यांनी हिरावून घेतला.

या घटनेत पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी संशयावरून काळू काशीनाथ डगळे, हिराबाई काळू डगळे यांना अटक केली असून संतोष काशीनाथ डगळे, काशीनाथ लक्ष्मण डगळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button