उदरनिर्वाह केला कसून रान, तरी नाही समाधान! शेतीसाठी ट्रॅक्टरखाली चिरडून घेतले काकाचे प्राण!

बुलढाणा : जमिनीचा मोह कोणालाच आवरत नाही. जमिनीसाठी राजे रजवाड्यांनी लढाया केल्या. जमीन काबीज करण्यासाठी युद्धे झाली. आताही किरकोळ जमिनीसाठी लोक नातीगोती विसरुन खूनासारखे कृर कृत्य सहजपणे करू लागली आहे. मुळातच खून खराब्याने कोणाचेच हित होत नाही. एखादा गुन्हा करून तुरूंगातच सडावे लागते हे कळत असूनही लोकांची मानसिकता सुधारत नसल्याचे भयानक वास्तव आहे. बुलढाणा जिल्ह्यात याचेच उदाहरण ठरणारी दुर्दैवी घटना घडली. पुतण्या त्याच्या काकाची दोन एकर जमिन कसत होता. पुढे काकाने ती जमिन परत मागितली, तेंव्हा मात्र पुतण्याने ती परत देण्यास नकार दिला. यातून पेटलेल्या वादात त्याने काकाला ट्रॅक्टरखाली चिरडून मारले. काकाचा शेतीतच बळी गेला, तर पुतण्या आपल्या मुलासह तुरूंगात गेला. या घटनेचा हा वृत्तांत.
अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीत धोत्रा भणगोजी या गावात जनार्दन तुकाराम जोशी हे सत्तर वर्षीय वृद्ध रहातात. त्यांच्या पत्नीच्या नावावर उत्रादा शेत शिवारात गट क्रमांक ५५ मध्ये ८८ आर (दोन एकर आठ गुढे) शेती आहे. ही शेती, बऱ्याच वर्षापासून त्यांचा पुतण्या समाधान जोशी हा कसत होता, पण १० वर्षांपूर्वी ही शेती माझ्या पत्नीच्या नावे आहे, ती आता मला परत हवी असा पवित्रा जनार्दन जोशी यांनी घेतला. आपण कसत असलेली जमीन आता आपल्या हातूने जाणार या विचाराने पुतण्या समाधान चिडला. त्यातूनच जनार्दन आणि पुतण्या समाधान यांच्या परिवारात संघर्षाची ठिणगी पडली, प्रत्येक वर्षी जून किंवा जुलै या मशागतीच्याच महिन्यात दोन कुटुंबात वाद होत होते. त्यांचे वाद शिवीगाळ व हाणामारीपर्यंत येऊन पोहचले होते. त्यांच्या शेतीच्या वादात गावातीलच संजय इंगळे हा मध्यस्थी करत होता. समाधान जोशी हा त्या शेतीवर ताबा मिळवायला पहात होता तर शेती पत्नीच्या नावावर असल्याने माझी आहे ही भूमिका काका जनार्दन यांची होती.
दि. ६ जून गुरूवारी काका आणि पुतण्या मध्ये वाद असलेली गट नं ५५ मधील शेती वखरणी करण्यासाठी जॉन डियर ट्रॅक्टर घेऊन समाधान जोशी हा मुलगा सागरसह सकाळी ११ शेतात गेला. त्या शेताशेजारी एक दुसरे शेत जनार्दन जोशी यांचे आहे. ते मुले आणि सूनेसह शेतात गेले होते. समाधान हा आपल्या मालकीच्या शेतात ट्रॅक्टरने वखरणी करत असल्याचे
जनार्दन यांना दिसले. त्याचवेळी ते समाधान यासु, ही शेती माझी असल्याने तू शेतीत वखरणी करू नको असे म्हणत ट्रॅक्टरच्या आडवे झाले. त्यावेळी ट्रॅक्टर चालवणारा समाधान सतापला. त्याने वृद्ध काका जनार्दन यांना शिव्यांची लाखोली वाहिली. जनार्दन जोशी यांची मोठी सून आणि लहान मुलानेही समाधानला समजावण्याचा प्रयत्न केला. समाधान मात्र ऐकत नव्हता, शेतीच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या संजय इंगळे बाला समाधानने कॉल करून घडलेला प्रकार सांगितला. त्यावर संजय इंगळे याने समजावून न सांगता, तू शेती वखरून घे, काय होते ते नंतर पाहून घेऊ अशी चिथावणी दिल्यामुळे ट्रॅक्टर समोर आडवा झालेला वृद्ध काका समाधानला व्हिलन बाटू लागला. ट्रॅक्टरवर त्याचा मुलगा सागरही शेजारी बसलेला होता. समाधानने काकास परत अश्लील शिवीगाळ करत रागातच ट्रॅक्टरचा गियर टाकून जोराने अँक्सीलेटरवर पाय ठेवला आणि ट्रॅक्टर गतीने पुढे नेऊन वृद्ध जनार्दन यांच्या अंगावरून नेला. वृद्ध जनार्दन जोशी शेतात कोसळले. एवढ्या वर न थांबता क्रूर समाधानाने मुलगा सागरच्या मदतीने जखमी काकास ट्रॅक्टरमध्ये टाकून शेतीच्या धुऱ्यावर जनावरासारखे फेकून पळ काढला.
दि. ६ जून गुरूवार दुपारचे चार वाजले होते. अमडापूर पोलिसांना माहिती मिळाली की, उत्रादा ‘शिवारातील एका शेतात धोत्रा * भनगोजी येथील जोशी परिवारातील काका-पुतण्यामध्ये उद्भवलेल्या वादात पुतण्याने ट्रॅक्टरखाली चिरडून सत्तर वर्षीय वृद्ध काकास चिरडून ठार केले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस स्टेशनपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या उत्रादा शेतशिवारातील गट नंबर
५५ मधील शेतातील घटनास्थळी अमडापूर पोलीस, २६ मिनिटात पोहोचले. घटनास्थळी शेतातील धुऱ्यावर प्रचंड गर्दी जमली होती. ७० वर्षीय वृद्ध जनार्दन जोशी यांच्या मृतदेहाजवळ त्यांच्या कुटुंबीयांचा काळीज हेलावणारा आक्रोश सुरू होता. मृतकाच्या बरगडीजवळ जखम झाली होती, तर हात तुटलेला स्पष्ट दिसत होता. त्यांना पुतण्या समाधान जोशी याने मुलाच्या मदतीने ट्रॅक्टरखाली निर्दयीपणे चिरडल्याचे मृतकाचे नातेवाईक पोलिसांना सांगत होते. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा व सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालय चिखली येथे पाठवण्यात आला.
वृद्ध जनार्दन जोशी यांच्या खून प्रकरणी सुधीर जनार्दन जोशी (रा. धोत्रा भणगोजी) यांच्या फिर्यादीवरून अमडापूर पोलिसांनी समाधान उत्तम जोशी (वय ४२), सागर समाधान जोशी (वय १८), संजय श्रीकृष्ण इंगळे (वय ३५, रा. धोत्रा भणगोजी) यांच्यावर अप. क्र. १६८/२४ कलम ३०२, ५०४, ५०६, १०९, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुतण्याने काकास ट्रॅक्टर खाली चिरडून ठार केल्याची बातमी काही क्षणात पंचक्रोशीत पसरल्याने खळबळ निर्माण झाली. अमडापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी समाधान जोशी यास गावातून तर त्याचा मुलगा सागर जोशी यास चिखलीवरून मध्यरात्री ताब्यात घेतले. तिसरा संशयित आरोपी संजय इंगळे मात्र पोलिसांना गुंगारा देऊन फरार होण्यात यशस्वी झाला. दुसऱ्या दिवशी ७ जून रोजी दोघा बाप-लेकांना चिखली न्यायालयासमोर दोघा केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत आरोपींना घटनेबाबत विचारणा केली असता, अवघ्या २ एकर शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या काकाचा निर्दयीपणे खून केल्याचे समोर आले.
न्यायालय आरोपींना काय सजा देईल ते येणाऱ्या काळात समजेल ? शेतीचे बोद असणाऱ्यांनी परस्पर सामंजस्याने किंवा गावातील समजदार व्यक्तींनी मध्यस्थी करून य वाद सोडवावे, अन्यथा शेत रहाते ह जागेबर, मरणारा जातो ढगात आणि मारणारा जेलात. यामध्ये ह कुटुंबाची व नात्यांची मोठी होरपळ होते ही सूर्यप्रकाशा एवढी सत्य गोष्ट आहे.
या घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, अमडापूर पोलीस स्टेशन ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, उपनिरीक्षक धनंजय इंगळे, ए.एस.आय.. लक्ष्मण टेकाळे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन राजपूत, प्रदीप चोपडे करत आहेत.