Crime Story : चारित्र्याच्या संशयाने पछाडला होता कैलास! त्याच्या मारहाणीत देवकाबाई झाली खलास!

पुणे : चिमा मुकणे हे सद्गृहस्थ आपली पत्नी मोराबाई मुकणे हे मूळचे खिरेश्वर ता. जुन्नर जि. पुणे या गावचे रहिवासी. ते पती-पत्नी दोघेही खिरेश्वर गावामध्ये आपल्या शेतावरच रहात होते. ते याच गावात शेतमजुरी करून आपली उपजिविका चालवत होते. त्यांना चार मुले व चार मुली असून त्या सर्वांचे विवाह झाले आहेत. आता ते सगळे पती-पत्नी मुलांसह वेगवेगळे रहात होते. याच गावामध्ये चिमा यांचा मुलगा दादासाहेब हा शेती व्यवसाय करत होता. शेतीमध्ये काम नसले तरी एखाद्या ठिकाणी मोलमजुरी करत होते. चिमा मुकणे याची तीन नंबरची मुलगी देवकाबाई हिचा विवाह नात्यामधील तळेरान बोरीचीवाडी येथील कैलास हिलम याच्याबरोबर साधारणपणे चौदा-पंधरा वर्षापूर्वी झालेला होता.
कैलास व देवकीबाई या उभयतांना चार मुली व एक मुलगा अशी पाच अपत्ये झाली होती. ते सुरूवातीला काही दिवस तळेरान बोरीची वाडी येथे रहात होते. तेथेच मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजिविका चालवत असे. तसेच दिवाळीनंतर ते मोलमजुरीसाठी मौजे वसार ता. अंबरनाथ जि. ठाणे येथील एका विट कारखानदाराच्या विटभट्टीवर जात असत. तसेच येथे सिझनला काम करून सिझन संपल्यावर तळेरान बोरीची बाडी येथे मूळगावी येत असत.
बिट कामगार म्हणून काम करतांना रोज श्रमाचे काम असल्याने कैलासला मित्र मंडळींच्या संगतीने दारूचे व्यसन जडले होते, त्यामुळे तो दिवसभर राबराब राबायचा व संध्याकाळी काम संपले कि मित्र मंडळींच्या संगतीने दारू पिऊन मस्त व्हायचा. मग कधी-कधी दारूच्या गुत्त्यावरच पिऊन पडायचा. देवकाबाई ही त्याला दारूच्या गुत्त्यावरून उठवून आणायची. तो घरी आल्यावर पत्नी देवकाबाईला शिवीगाळ व मारहाण करायचा. ती त्याला म्हणायची, आपल्याला पाच मुले आहेत. त्या मुलांकडे तरी बघून दारू पिऊ नका. तुम्ही माझा विचार करा. तो तेवढ्यापुरता हो म्हणायचा व दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा पहिले पाढे पंचावन्न सुरू व्हायचे. देवकाबाई त्याच्या दारू पिण्याला जसा विरोध करू लागली तसा कैलास तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला छळू लागला होता. तिला मारझोड करू लागला.
त्रासाला खूप कंटाळली होती. ती आपल्या आईला व भावाला फोन करून कैलासबद्दल तक्रार करू लागली. तसेच ती माहेरी आली कीकैलासबद्दल व त्याच्या चारित्र्याच्या संशयाबद्दल सांगू लागली. त्यावेळेस तिच्या आई-वडीलांनी व भावाने कैलासला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच देवकाबाईला सांगितले कि, आज नाही तर उद्या कैलास सुधारेल, तू मन घट्ट करून रहा. तिची समजूत काढून तिला पुन्हा कैलाससोबत नांदायला पाठवत असत. ती बिचारी आपल्या आई-वडीलांच्या शब्दाखातीर पुन्हा कैलासबरोबर नांदायला जात असे. असेच दिवसामागून दिवस चालले होते.
साधारणपणे २०२३ मध्ये देवकाबाई हिचे संपूर्ण कुटुंब मौजे वसार ता. अंबरनाथ जि. ठाणे याठिकाणी विटभट्टीवर मजुरीने कामाला गेले होते, तेंव्हापासून ती त्याच ठिकाणी रहात होती. थोडे दिवस कैलास व्यवस्थित राहिला, परंतु तेथे काम करणान्या कामगारांसोबत कैलास पुन्हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला. तो चारित्र्याचा संशय घेऊन तिला शिवीगाळ व मारहाण करू लागला होता.
देवकाबाईला काय करावे ते सुचत नव्हते. ती बिचारी मुकाटपणे सगळे सहन करत होती. तिचा नाईलाज होता. तिला बाटायचे कि आपण आपल्या आई-वडीलांना व भावांना आपले दुःख सांगून त्यांना कशाला त्रास वा मनस्ताप द्यायचा म्हणून ती काही सांगत नव्हती. कैलास मात्र आता सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस दारू पिऊन तर्राट होत होता. देवकाबाई व तिची मुलं आपल्या बापाकडे पाहून काही बोलत नव्हती, कारण तो आपल्या मुला-बाळांनाही मारझोड करायला कमी करत नव्हता. तो घरात त्याच्या मनासारखा बागत होता. तो कुटुंबाचा छळ करण्यातच धन्यता मानत होता.
दि. ७ एप्रिल २०२४ च्या दिवशी सकाळपासून कैलास दारू पिऊन आला आणि देवकाबाईला त्रास देऊ लागला. आधी त्याने हाताने मारहाण केली. मंतर काठीने व बिटेने जोरात मारहाण सुरू केली, त्यामुळे देवकाबाई भयभीत होऊन ज्या विटभट्टीवर काम करत होती तिथून निघून ती आपल्या सासरी घरी तळेरान बोराची वाडी येथे निघून आली होती. देबकाबाई तिथून निघून आल्यावर ज्या विटभट्टीवर काम करत होती त्या मालकाने देवकाबाईची बहीण मंदा अनिल वाघ रा. खानापूर, ता. जुन्नर, जि. पुणे यांच्या मोबाईलवर फोन करून कळवले की, कैलासने आज सकाळपासून दारू पिऊन येऊन देवकाबाईला जबर मारहाण केली आहे आणि ती येथून निघून गेली आहे, तर ती गाबी पोहचली आहे का ते बघा. खात्री करून कळवा.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. ८ एप्रिल २०२४ रोजी दुपारी दोन वाजता देवकाबाईची बहीण मंदा व मेहुणे अनिल है खिरेश्वर या गावी आले. त्यांनी देवकाबाईचे आई व वडील यांना भेटून सर्व हकीकत सांगितली. मग देवकाबाईची आई मोराबाई मुकणे, बहीण मंदा वाघ, मेव्हणे अनिल वाघ हे सर्व जण मिळून देवकाबाई हिच्या सासरी तळेरान बोरीचीबाड़ी याठिकाणी गेले. त्यावेळी देवकाबाई जखमी अवस्थेत विव्हळत होती. तिला फैलासने विटेने च हाताने मारहाण केली होती. त्या सर्वांनी देवकाबाईला सोबत घेऊन खिरेश्वर येथे आणले. त्यावेळी तिला व्यवस्थित उठता-बसता येत नव्हते. तिच्या अंगावर ठिकठिकाणी मारहाणीच्या जखमा झालेल्या दिसत होत्या. त्यावेळी तिच्या आईने व भावाने-बहीणीने देवकाबाईला विचारले असता तिने सांगितले, माझा नवरा कैलास मला दि. १ एप्रिल २०२४ पासून दारू पिऊन मारहाण करत होता. तसेच विटभट्टीवर काम करतांना हाताने व लाथा-बुक्क्याने बेदम मारहाण करायचा. तो तिला उपाशीपोटी ठेवायचा, तसेच दि. ७ एप्रिल २०२४ रोजी तळेरान बोरीची वाडी येथे आणल्यावरही सायंकाळी साडेचार ते आठ वाजण्याच्या दरम्यान कैलास हिलाम याने हाताने व लाथा-बुक्क्याने मारून शिवाय घरात पडलेली विट तिच्या डोक्यात मारली. विटेने मारहाण झाल्याबर देवकाबाई तशीच घरात पडून होती, तरीही त्याने तिला उपचारासाठी दवाखान्यात नेले नाही.
देवकाबाईला माहेरी आणल्यानंतर तिची आई मोराबाई हिने तिला अंघोळ घातली. त्यानंतर तिला जेवू घालण्याचा प्रयत्न केला असता तिने जेवण न करता जमिनीवर अंग टाकून दिले. सायंकाळी साधारणपणे सात वाजण्याचा सुमार झालेला असावा. देवकाबाई कोणत्याच प्रकारची हालचाल करत नसल्याने तिचे सगळे नातेवाईक मंडळी घाबरले.त्यांना काय करावे ते सुचेना, मग तिच्या भावाने दादाभाऊ मुकणे याने त्यांच्या गावचे पोलीस पाटीलअभिजित भौरले यांना ही घटना सांगितली.
पोलीस पाटीलांनी तत्काळ ओतूर पोलीस स्टेशनलासंपर्क साधला. त्यावेळी ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी. थाटे यांनी तत्काळ आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. रूग्णवाहिकेला पाचारण केले. देवकाबाईला रुग्णवाहिकेतून ओतूर येथील सरकारी दवाखान्यात आणले असता तेचील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देवकाबाईला तपासून ती उपचारापूर्वीच मयत झाली असल्याचे सांगितले. त्यानंतर देवकाबाईचे वडील चिवमा दाजी मुकणे यांनी दि. ९ एप्रिल २०२४ न रोजी ओतूर पोलीस स्टेशनला देवकाबाई हिच्या मृत्यूबाबत खबर दिली. त्यानंतर देवकाबाई हिच्या वा मृतदेहाचे ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी पोस्टमार्टम केले असता तेथील वैद्यकीय . अधिकाऱ्यांनी सांगितले कि मयताच्या चेहऱ्यावर, कपाळावर, व मानेवर, पोटावर, हातावर व पायावर अशा ठिकठिकाणी जखमा असल्याचे तसेच डोक्यात अंतर्गत जखमा झाल्या असल्याचे दिसून आले, त्यामुळे तिचा मृत्यू झाला.
देवकाबाईच्या मृत्यूस कारण ठरल्यामुळे तत्काळ कैलास हिलम याला सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. जी. थाटे व त्यांच्या सहका-यांनी तत्काळ सापळा लावून पकडले व त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यावेळेस गुन्ह्यात वापरलेली विट, घटना घडतेवेळी त्याने अंगावर परिधान केलेले कपडे जप्त करण्यात आली. कैलास हिलम याच्याविरूध्द ओतूर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं. १३८/२०२४ भा.दं.वि. कलम ३०२, ३२४, ३२३ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
या गुन्ह्याचा अधिक तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर विभागाचे डी. वाय.एस.पी. रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.बी. थाटे हे आपले सहकारी पी.एस.आय. अनिल केरूरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळाशीराम भवरी, महेश पठारे, धनंजय पालवे, पोलीस नाईक न देविदास खेडेकर, ज्योतीराम पवार यांच्या मदतीने करत आहेत.