‘फेंगल’ चक्रीवादळाचा उत्तर भारताला दणका, महाराष्ट्रावर होणार परिणाम
बंगळुरू : बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे तमिळनाडू व आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर तब्बल ताशी ८० ते ९० किलोमीटर इतका वेगाने वारे वाहू लागले होते. बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळाने तामिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टी पूर्णपणे ओलांडली आहे. हवामान खात्याने ही माहिती दिली आहे.
‘फेंगल’मुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे तामिळनाडूतील उत्तर भागात, आंध्र प्रदेशात, पुडुचेरी येथील रस्ते, हवाईमार्गे होणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. खबरदारी म्हणून पुडुचेरी व तामिळनाडूच्या किनारपट्टी भागातील हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. सुदैवाने या चक्रीवादळामुळे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही.
वादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू तसेच पुडुचेरी येथील प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली होती. तामिळनाडूसह पुद्दुचेरी, कर्नाटक आणि दक्षिण आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. दरम्यान, वादळ धडकणार असल्याने कोणीही समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये, असा इशारा देण्यात आला होता.
फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणामककक
चक्रीवादळ उत्तर भारतातील थंड वाऱ्यांना वेगाने दक्षिणेकडे ढकलत आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात तसेच दक्षिण भागातही थंडी वाढत आहे. चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हे कमी दाबाचे पट्टे थंड वाऱ्यांना खेचत आहे. त्यामुळे आर्द्रतेत बदल होतो आणि ढगाळ हवामान तयार होते. अशा सर्व परिस्थितीमुळे पुढील तीन दिवस थंडीची तीव्रता वाढणार आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. आज पुन्हा एकदा कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर पुढच्या दोन दिवस 3 ते 5 डिग्री तापमान घसरण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत थंडीचा कडाका वाढू लागलाय.
नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये पारा 8.3 अंशावर गेला आहे. पुणे आणि जेऊरमध्ये भागात तापमान 10 अंशांच्या खाली गेलं आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे आणि सोलापूरजिल्ह्यातील काही तालुक्यात थंडी वाढली आहे. जिल्ह्याचा पारा आणखी घसरला असून, बुधवारी सातारा शहरात १२, तर महाबळेश्वरला ११.८ अंशाची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यात थंडीची लाट आल्याचे चित्र आहे. ग्रामीण भाग गारठला असल्याने शेतीच्या कामावरही परिणाम झाला आहे.