क्राइमक्राइम स्टोरीमहाराष्ट्र

डिअर अहो, खूप प्रेम केलं तुमच्यावर… आता बाय…

चिठ्ठी लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : चरित्र्यावर संशय घेवून छळ करत असल्याने एका डॉक्टर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहाच्या चार महिन्यांमध्ये पतीच्या संशय वृत्तीमुळे कौटुंबिक वाद होत होते. या प्रकरणाची नोंद सिडको पोलिस ठाण्यात घेण्यात आली.

शहानुरमियाँ दर्गा परिसरात राहणारे प्रकाश भुसारे यांची मुलगी प्रतीक्षा हिचा विवाह चार महिन्यांपूर्वी कन्नड येथील प्रीतम गवारे याच्याशी झाला. प्रतीक्षा या गेल्या एक महिन्यापासून एमजीएम रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होती.ते टेलिकॉम हाउसिंग सोसायटी, बजाजनगर येथे राहत होते.

राखी पौर्णिमानिमित्त गावी गेलेल्या प्रीतमला प्रतीक्षाने बोलवून घेतले. प्रीतम शनिवारी घरी आल्यानंतर त्याला प्रतीक्षा गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आली. प्रीतमने तिला तत्काळ बेशुद्ध अवस्थेत एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

प्रतीक्षाला एमजीएम रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्रीतमने प्रतीक्षाच्या नातेवाइकांना ती दवाखान्यात असल्याचे कळवले. प्रतीक्षाचे नातेवाईक दवाखान्यात येताच त्याने तेथून पळ काढला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून घटनास्थळी पंचनामा केला असता प्रतीक्षाच्या घरातून चार पान सुसाइड नोट मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चार पानी सुसाईड नोट?
डिअर अहो, खूप प्रेम केलं तुमच्यावर, स्वत:ला विसरुन गेले. तुम्ही माझ्यासारख्या हसत्याखेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं. तुम्ही एका स्वावलंबी मुलीला डिपेंडंट बनवलं. खूप स्वप्न घेऊन तुमच्याशी लग्न केले होते. तुम्ही मला खूप जीव लावाल, काळजी घ्याल. करिअरमध्ये सपोर्ट कराल. आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा लागत होता ना त्याचीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं. पण आज ही वेळ आणलीत तुम्ही माझ्यावर, असं या डॉक्टरने सुसाइड नोटमध्ये लिहिलं.

पती सतत चारित्र्यावर संशय घेत असल्याचं या डॉक्टरने पत्रात लिहिलं आहे. तसेच, त्याच्या सांगण्यावरुन मित्र-मैत्रिणी काय नातेवाईक आणि घरच्यांशी बोलणं देखील सोडलं, असं ती म्हणाली. तुम्ही जे सांगितलं ते सर्व केलं, पण तरी तुम्ही सतत माझ्या चारित्र्यावर संशय घेत राहिलात, पण मी फक्त तुमच्याशी प्रामाणिक होते, असंही ती म्हणाली. तसेच, यामध्ये तिने आपल्या आई-वडिलांची आणि भावाची माफीही मागितली आहे. पण, मला असं जगावं वाटत नाही, असं ती म्हणाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button