भंडारा : जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसला आहे. तेलंगणा राज्यातील मुलुगू हे भूकंपाचे केंद्र असल्याचे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र यांनी सांगितले. आज सकाळी 07.27 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 5.3 किश्टर स्केल आहे.
भंडारा जिल्ह्यात सध्याच्या अनुषंगाने कोणत्याच प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याची झालेली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन माहिती घेता येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.
An earthquake with a magnitude of 5.3 on the Richter Scale hit Mulugu, Telangana at 7:27 AM today: National Center for Seismology pic.twitter.com/PKq7BnFxke
— ANI (@ANI) December 4, 2024
अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राशी लागून असलेल्या तेलंगाणा या राज्यातील मुलुगू हा या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. महत्त्वाचे म्हणजे याआधीही याच भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. यावेळी मात्र भूकंपाची तीव्रता अधिक होती. परिणामी या भूकंपाचे धक्के महाराष्ट्रातील काही सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये बसले. यात भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. काही इतर राज्यांच्या सीमेवरही हे भूकंपाचे धक्के बसले आहेत. सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास हे घटना घडल्या आहेत.
या भूकंपाचे धक्के हैदराबादमध्येही जाणवले. सकाळी ७.२७ वाजता भूकंप झाला. त्याचे केंद्र जमिनीपासून 40 किलोमीटर खोल होते. त्यासोबतच या भूकंपाचे हादरे छत्तीसगढमध्येही जाणवले असल्याची माहिती समोर येत आहे.