आमदार संतोष बांगर यांना निवडणुक आयोगाची नोटीस

हिंगोली : एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यमुळे स्वत:सोबत पक्षालाही अडचणीत आणत असतात. अशातच विधानसभा निवडणुकीच्या तोंउावर त्यांनी एक वाद ओढावून घेतला आहे.
या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात. बाहेरगावी असलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट दोन-तीन दिवसांमध्ये द्यावी, त्यांना सांगा गाड्या करा, गाड्यांसाठी जे काही लागतं ते त्यांना फोन पे करतो, त्यांना सांगा येण्या-जाण्याचा जे काही लागते ते आम्हाला सांगा.
असे आर्थिक प्रलोभन देणार वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केले. ते हिंगोलीतील कळमनुरी येथील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
निवडणूक आयोगाने घेतली दखल
आमदार बांगर यांनी मतदारांना पैशाचं प्रलोभन दिल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. त्यांच्या या मागणीची दखल घेत निवडणूक आयोगाने आमदार संतोष बांगर यांना त्या वक्तव्याचा खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे. तसेच पुढील 24 तासांमध्ये आमदार बांगर यांनी खुलासा सादर करावा असं त्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.