महिला जलतरणपटू इतकी HOT की, इतर खेळाडूंचे लक्ष्य विचलित होऊ नये म्हणून पाठवले घरी?

पॅरिस : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक गेम्समधून पॅराग्वेच्या एका महिला जलतरणपटूला ऑलिम्पिक व्हिलेजमधील निवासस्थान रिकामे करण्यास सांगण्यात आले. त्याचे कारण ती अतिशय सुंदर आहे आणि तिचे सौंदर्य पॅराग्वे संघातील इतर खेळाडूंसाठी ‘लक्ष्य’ विचलित करणारे ठरत होते. एखाद्या खेळाडूला तिच्या सौंदर्यामुळे खरोखरच ऑलिम्पिकमधून बाहेर केले जाऊ शकते का? कोण आहे ही जलतरणपटू आणि काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला तर मग जाणून घेऊया.
लुआना अलोन्सो असे या तरुण महिला पॅराग्वेयन जलतरणपटूचे नाव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लुआना अलोन्सो इतकी हॉट आहे की तिचे चित्तथरारक सौंदर्य संघातील इतर खेळाडूंचे लक्ष्य विचलित करत होते. तिच्या तिथे असण्याचा संपूर्ण पॅराग्वे संघावर चुकीचा परिणाम होऊ लागला होता, त्यामुळे तिला संघ व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार मायदेशी परतावे लागले. ब्लास्टने दिलेल्या वृत्तानुसार, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अलोन्सोने तिच्या सौंदर्याने अनेकांची मने जिंकली होती, मात्र या खेळाडूसाठी हे सौंदर्य चांगलेच महागात पडले आहे, तिच्यामुळे पॅराग्वे संघातील इतर खेळाडूंचे लक्ष्य विचलित होऊ लागले व अनेक सहकारी तिच्या सौंदर्याने मोहीत झाले. त्यामुळे ऑलिम्पिक संपण्यापूर्वीच तिला ऑलिम्पिक व्हिलेजमधील निवासस्थान रिकामे करण्यास सांगण्यात आले . पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच अलोन्सोने जलतरणातून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तिने आपल्या चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले, परंतु ऑलिम्पिक व्हिलेज सोडण्याबद्दल अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. पॅरिस गेम्सचा 11 ऑगस्टला समारोप होत आहे.
पॅराग्वेला परतल्यानंतर अलोन्सोने जलतरणातून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याच्या भविष्यातील योजना काय आहेत याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. लुआना अलोन्सो 100 मीटर बटरफ्लाय हीट्सच्या पुढे जाऊ शकली नव्हती. अंतिम फेरीसाठी पात्र न ठरल्यामुळे तिचा पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रवासही संपला होता, तरीही खेळाडूंची इच्छा असल्यास ते समारोप समारंभापर्यंत ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहू शकतात, मात्र तिला त्याआधीच ऑलिम्पिक व्हिलेजमधील निवासस्थान रिकामे करण्यास सांगण्यात आले.